Top news मनोरंजन

गंदी बात वेबसीरिजच्या पाचव्या भागाचा इन्टिमेंट सीन शुट करतानाचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई | एकता कपूरचे प्रोडक्शन हाऊस असणाऱ्या अल्ट बालाजीची ‘गंदी बात’ ही एक लोकप्रिय वेबसिरीज आहे. गंदी बात वेबसिरीजचे चार सिझन आत्तापर्यंत रिलीज करून झालेले आहेत. गंदी बातचा पाचवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. गंदी बात 5चा ट्रेलर लॉंच होण्यापूर्वी शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

या व्हिडीओमध्ये अभिनेता लक्ष्य हांडा अभिनेत्री आलिया सिंग सोबत रोमान्स सीन शूट करताना दिसत आहे. या सीनमधील दोन्ही कलाकार एकमेकांच्या रंगात रंगून गेले आहेत. अतिशय बोल्ड असणारा हा सीन सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे.

नुकतंच अल्ट बालाजीनं ‘गंदी बात 5’चं पोस्टर शेअर केलं होतं. या पोस्टरवर लिहिलं होतं की, आता कंट्रोल करणं अवघड आहे कारण यावेळी मामला गरम आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल झालं होतं. तसेच गंदी बात 5चा ट्रेलर सुद्धा सध्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

अल्ट बालाजीनं त्यांच्या ऑफीशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये प्रचंड बोल्ड सीन्स दिसत आहेत. येत्या 8 ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट बालाजीवर ही वेबसिरीज प्रदर्शित केली जाणार आहे. या ट्रेलर सोबत वेबसिरीजविषयी काही माहितीही देण्यात आली आहे.

यावेळी प्रेक्षकांसाठी खूप वेगवेगळ्या कहाण्या असतील. तसेच आता गंदी बात सिझन 5 पाहताना तुमच्या भावना आणि होश दोन्हीही आऊट ऑफ कंट्रोल होतील, असं कॅप्शन या व्हिडीओबर देण्यात आलं आहे.

तसेच या सिझनमधल्या कलाकारांविषयीही सध्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. पूजा डे, फरमान हैदर, सान्या बंसल, नितिन भाटिया, सावंत सिंह प्रेमी, अंकित भाटिया आणि पामेला मंडल हे कलाकार या सिझनमध्ये दिसणार आहेत.

पामेला मंडल यापूर्वी उल्लूची सर्वात जास्त बोल्ड वेबसिरीज ‘घपा घप’मध्ये दिसली होती. घपा घप या सिरीजला लोकांचं भरपूर प्रेम मिळालं होतं. आता पामेला गंदी बात 5 मध्ये दिसणार आहे.

दरम्यान, एकता कपूरच्या गंदी बात या वेबसिरीजला पहिल्या सिझनपासूनच लोकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. गंदी बात सिझन 4 मधील एका सीनमुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. या सीनमुळे भारतीय सैन्याच्या वर्दीचा अपमान झाला आहे, असा आरोप अल्ट बालाजीवर करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

अखेर नेहा कक्करचं ठरलं; या व्यक्तीसोबत लग्न करणार?

“सुशांतला धमकावत त्याच्यावर बला.त्काराचे आरोप केले जात होते”

पहिल्या महिंद्रा थारची बोली पोहोचली 1.10 कोटीवर; का लावत आहेत लोक एवढी बोली?

‘टॉप’वर पोहचण्यासाठी अनेक हिरोईननी केलं ‘हे’ काम; ईशा कोप्पिकरचा धक्कादायक खुलासा

रतन टाटांच्या टाटा मोटर्सला भारतीयांची साथ, सप्टेंबरमध्ये तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी विक्रीत वाढ…!