आता तर हद्दच झाली! ग्रामस्थांनी केली सोनू सूदकडे ‘ही’ अनोखी मागणी

लाॅकडाऊन काळात गरजूंचा मसीहा बनलेला अभिनेता म्हणजे सोनू सूद. त्यानं लाॅकडाऊन काळात अनेक गरिब लोकांची वेगवेगळ्या मार्गानं मदत केली. एवढच नाही तर अजूनही तो मदतीचा हात पुढे सरसावताना दिसतो. कोणाला कधाही काहीही गरज लागली तर तो त्याच्या मदतीसाठी नेहमी हाजीर असलेला पहायला मिळतो. यातच आता सोनू सूदकडे ग्रामस्थांनी  एक अणोखी मागणी केलेली पाहायला मिळाली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीसाठी सोनूकडे अनेक वेगवेगळ्या मागण्या येत असतात. मात्र या वेळेस तर हद्दच झाली, आता उच्छाद मांडणाऱ्या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्याच्याकडे करण्यात आली आहे. सोनू सूदने त्याचीही तयारी दाखवली आहे.

“सोनू सूद सर, आमच्या गावात एका वानराने उच्छाद मांडला आहे. त्याच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे आमची मनापासून विनंती आहे की या वानराला गावातून बाहेर कुठेतरी दूर जंगलात नेऊन सोडावं”, अशी विनंती या गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

सोशल मीडियावर ट्विट करत उत्तर प्रदेशमधील बासु गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने सोनू सूदला टॅग केलं आहे. त्याचबरोबर  या ट्वीटसोबत एका स्थानिक वृत्तपत्रातील बातमीची दखल देण्यात आली आहे.

या ट्विटला सोनूनं देखील मजेशीर उत्तर दिलं आहे. सोनू सूद याला रिप्लाय देताना म्हणाला की, “बास, आता माकडांना पकडायचं तेवढं राहीलं होतं मित्रा. पत्ता सांग, हे पण करुन पाहतो.”

2020 या वर्षात सर्वांनीच अनेक संकटांचा सामना केला. कोरोना व्हायरसचा फटका सर्व सामान्य जनतेपासून मोठ्या सेलिब्रिटींना देखील बसला. या महामारीच्या काळात प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला. पण अभिनेता सोनू सूदने मात्र अनेकांची मदत केली. चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमीका साकारणार सोनू कोरोना काळात मात्र सामान्य जनतेसाठी हिरो ठरला.

महत्वाच्या बातम्या –

दररोज लवंग खाण्यानं होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

काँग्रेस नेत्यानं गर्लफ्रेंडला दिलेल्या ‘या’ अनोख्या गिफ्टची सगळीकडं चर्चा; वाचा काय आहे हे गिफ्ट

अंकिता लोखंडे म्हणते ‘धकधक करने लगा’, पाहा नेमकं काय झालंय!

गंदी बात! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक व्हिडीओ, पोलिसांनी केली अ.टक

बिबट्यानं मगरीला जबड्यात धरून खेचत पाण्याबाहेर आणलं, शेवटी…; ‘हा’ व्हिडीओ तुफान व्हायरल