मुंबई | प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम ‘बिग बाॅस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सिझन चांगलेच गाजले आहेत. अशातच नुकतच ‘बिग बॉस मराठी 3’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दिग्गज अभिनेते-निर्माते महेश मांजरेकर ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालन करतात. मांजरेकरांच्या स्टाईलचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे पुढील सिझनची सूत्रंही मांजरेकरांच्याच हाती सोपवली जाणार आहेत. दोन वर्षापासून ‘बिग बॉस’चा मराठमोळा आवाज नव्याने ऐकण्यासाठी प्रेक्षकांने कान आसुसले आहेत.
कलर्स मराठीनेही त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत बिग बॉस मराठी 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं होतं. अशातच अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून 19 सप्टेंबरला हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
महेश मांजरेकर यांचे सूत्रसंचालन, कार्यक्रमातील सदस्य, त्यांची भांडण, त्यांची दोस्ती-यारी, नॉमिनेशन प्रक्रिया, कॅप्टन्सी, टास्क या सगळ्या गोष्टींनी प्रेक्षकांची मनं जिंकली. सप्टेंबर महिन्यात मनोरंजनाचा डबल डोस असणार हे यामुळे निश्चित झालं आहे. कारण ज्या दिवशी आयपीएल सुरु होणार त्याच दिवशी बिग बॉसचा तिसरा सीझन सुरू होत आहे.
बिग बाॅस मराठीचं घर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालं आहे. शंभर दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातील 15 सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र बंदिस्त होतील. अनलॉक एंटरटेनमेंट अशी बिग बॉसच्या नव्या सिझनची थीम आहे.
‘दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, कारण येतोय बिग बॉस 3. लवकरच कलर्स मराठीवर’. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या वेळेस कोणते सेलिब्रेटी जातील याविषयी सगळेच उत्सुक असलेले पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या –
रिंकू राजगुरुचा आपल्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा, म्हणाली…
धक्कादायक! बिग बाॅसच्या घरात हाणामारी, घरातून स्पर्धकाला दाखवला बाहेरचा रस्ता
कोरोना काळात ‘अशी’ वाढवा लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती!
खासदार नुसरत जहाँच्या घरी चिमुकल्याचं आगमन!
कोरोनाच्या भीतीनं चक्क माकडानंही लावला मास्क, पाहा व्हिडीओ!