‘या वर्षी कोरोनाची साथ….’; WHO प्रमुखांच्या वक्तव्याने टेंशन वाढलं

मुंबई | जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) जगभरातल्या नागरिकांना वेगानं पसरणाऱ्या व्हेरियंटच्या बाबतीत अधिक सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. या वर्षी कोरोनाची साथ कोणत्या तीन संभाव्य मार्गांनी विकसित होऊ शकते, असं अलर्ट केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉन (Omicron) आणि डेल्टा (Delta) या व्हेरिएंट्सच्या (Variant) संयोगातून तयार झालेला डेल्टाक्रॉन (Deltacron) हा विषाणू (Virus) वेगानं फैलावतो.

याशिवाय ओमिक्रॉनचा सबव्हॅरिएंट BA.2ची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. कोविड-19 च्या नव्या व्हॅरिएंटमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

कोविड -19 हा विषाणू सतत विकसित होत आहे, हे आम्हाला माहीत आहे. परंतु, लस (Vaccine) आणि संसर्गामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे होणाऱ्या आजाराची तीव्रता कालांतराने कमी होत जाते, असंही त्यांनी म्हटलंय.

प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यास कोविड-19 च्या केसेसमध्ये आणि मृत्यूच्या संख्येत वेळोवेळी वाढ होऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत असुरक्षित व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज भासू शकते, असं ते म्हणाले.

यासाठी जगभरातल्या सर्व देशांनी 5 मुख्य घटकांवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. यात पहिले घटक म्हणजे सर्व्हेलन्स, लॅबोरेटरीज आणि सार्वजनिक आरोग्यविषयक माहिती. दुसरे घटक म्हणजे लसीकरण, सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाय, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

Petrol Diesel Prices Today | आज पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी पेट्रोल-डिझेल महागलं 

समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्या- सुप्रिया सुळे 

सर्वात मोठी बातमी! मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू 

‘या’ शेअरमुळे गुंतवणूदार बनले कोट्यधीश; लाखाचे झाले ‘इतके’ कोटी 

Corona: राज्याच्या कोरोना आकडेवारीत मोठी घट, वाचा आजची ताजी आकडेवारी