मुंबई | कोरोनामुळे मानवी जीवनावर भयंकर वाईट परिणाम झाला आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेणारा हा विषाणू आजही जगात आहे. भारतासह सर्वच देशांना आतापर्यंत कोरोना विषाणूची पहिली आणि दुसरी लाट सहन करावी लागली आहे. यामुळे कोरोना कधी संपणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर WHO नं दिलं आहे.
आज जगातला एकही देश करोनाच्या प्रभावापासून सुरक्षित राहिलेला नाही. पण जमेची बाजू ही आहे की आज आपल्याकडे करोनाशी लढा देण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध आहेत. तसेच, कोरोनावर उपचार करण्यासाठी देखील औषधं हाती आहेत. मात्र, जगात जितकी जास्त असमानता असेल, तेवढा हा विषाणू आपण कल्पनाही करू शकणार नाही किंवा बचाव करू शकणार नाही अशा पद्धतीने घातक होऊ शकतो, अशी भिती WHO प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनावर मात करायची असेल, तर आपल्याला असमानता नष्ट करावी लागेल, असं टेड्रॉस म्हणाले. जर आपण आपल्यातली असमानता नष्ट केली, तर आपण हे करोनाचं संकट देखील नष्ट करू शकू. आपण करोना साथीच्या तिसऱ्या वर्षात प्रवेश करत असताना मला विश्वास वाटतोय की आपण याच वर्षी करोनाला संपवू शकतो, पण फक्त आपण एकत्रपणे त्यासाठी प्रयत्न केले तर, असं टेड्रॉस म्हणाले.
कोरोनाला पराभूत करायचं असेल, तर प्रत्येक देशातली किमान 70 टक्के लोकसंख्या पूर्ण लसीकृत असायला हवी, असं म्हटलं आहे. यासाठी सगळ्यांनी एकत्रपणे काम करून हे जागतिक लक्ष्य साधायला हवं. 2022 च्या मध्यापर्यंत हे लक्ष्य आपण सगळ्यांनी मिळून साध्य करायला हवं, असं ते म्हणाले.
दरम्यान, 1 जानेवारी म्हणजेच वर्षाच्या पहिल्या दिवशी देशात एकाच दिवसात कोरोनाची 22,775 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, ही 6 ऑक्टोबरनंतरची सर्वाधिक प्रकरणं आहेत.
आता देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही एक लाखाच्या पुढे गेली आहे. यासोबतच कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटची (Omicron Variant) 161 नवीन प्रकरणं समोर आल्यानंतर ओमिक्रॉनबाधित एकूण रुग्णांची संख्या 1431 वर पोहोचली आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, तज्ञांचं म्हणणं आहे की महामारीची तिसरी लाट आधीच उंबरठ्यावर आहे आणि ओमिक्रॉनने डेल्टा व्हेरिएंटची जागा घेण्यास सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुख्यमंत्री-राज्यपाल पुन्हा आमने सामने; राज्यपालांकडून चौकशीचे आदेश
सुप्रिया सुळेंनी पटकावला नंबर वनचा किताब, लोकसभेत दमदार कामगिरी
भाजप आमदार म्हणतात, “मी अजितदादांचा फॅन, मी त्यांचं…”
“…त्यावेळी अनिल देशमुखांनी मदत केली”, नितीन गडकरींनी मानले आभार