‘या’ लोकांना Omicron चा सर्वात जास्त धोका ; WHO ने दिला गंभीर इशारा

नवी दिल्ली | कोरोना महामारीने संपूर्ण जग हादरून गेलंय. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने लाखो लोकांचा बळी घेतला आहे. संपूर्ण जग ओमिक्रॉनशी (Omicron-Covid19) झुंज देत आहे. अशात ओमिक्रॉनबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हा व्हेरिएंट डेल्टाच्या तुलनेत कमी घातक असला, तरीही त्या लोकांसाठी ओमिक्रॉन धोकादायक ठरू शकतो, ज्यांचं लसीकरण झालेलं नाही. आरोग्य संघटनेनं त्या बातम्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे, ज्यात लोक ओमायक्रॉनला कमी घातक आणि सामान्य सर्दी-खोकला मानत आहेत.

ओमिक्रॉन व्हेरिएंटला हलक्यात घेऊ नका. लोकांमधील भीती कमी होण्याचं एक महत्त्वाचं कारण लसीकरण हेदेखील आहे. लसीकरणामुळे या व्हेरिएंटपासून सुरक्षा मिळत असल्याने लोक याला कमी घातक समजत आहेत. मात्र, काही देशांमध्ये या व्हेरिएंट आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात प्रभावित केल्या आहेत, असं भारतातील निती आयोगाचे अध्यक्ष डॉ. व्ही के पॉल यांनी म्हटलं आहे.

डॉ. व्ही के पॉल आरोग्य मंत्रालयाच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी  कोविड विकली पॉझिटिव्हिटी रेट ऑफ हाय रिस्क सिटीची यादी जारी केली आहे.

देशातील कोरोना स्थितीबद्दल बोलताना हेल्थ मिनिस्ट्रीने सांगितलं की देशातील 300 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यापेक्षा जास्त आहे. यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरातमधील जिल्ह्यांचा समावेश आहे.

मागील आठवड्यात यात बंगालमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक 60.29 होता. जो दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईपेक्षाही जास्त होता.

कोलकातामध्ये सर्वाधिक विकली पॉझिटिव्हिटी रेट आहे. सरकारी डाटानुसार, 5 ते 12 जानेवारीदरम्यान मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट 26.95 टक्के, बंगळुरू 12.29 टक्के, ठाणे 31.54 टक्के, चेन्नई 23.32 टक्के, पुणे 23.4 टक्के आणि कोलकातामध्ये 60.29 टक्के होता.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना संसर्गाचा दर 11.05 टक्के एवढा झाला असून कालच्या तुलनेत रुग्णवाढीचा दर 15.9 टक्के एवढा जास्त नोंदवला गेला. तसेच देशातील ओमिक्रॉनच्या (Omicron) एकूण रुग्णांची संख्या 4868 एवढी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

शारिरीक संबंध ठेवताना आनंदाच्या भरात घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार 

  मुख्यमंत्र्यांच्या वडिलांची राष्ट्रपतींकडे इच्छामृत्यूची मागणी; कारण ऐकून व्हाल थक्क

 सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा वाढ! जाणून घ्या आजचा बाजारभाव

 RTPCR चाचणी निगेटिव्ह आली तरी लक्षणं दिसताय?; मग ‘हे’ कारण असू शकतं

  पैशांसोबतच बायकोकडे ‘या’ गोष्टींची मागणी करणंही गुन्हा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय