कोरोनापासून वाचण्यासाठी महिलेनं शोधून काढला भयंकर उपाय, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा आरोग्य सेवेवर ताण आला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बेड आणि त्याचबरोबर ऑक्सिजन सिलेंडचीही मागणी वाढू लागली आहे. याचदरम्यान सोशल मीडियावर सध्या कोरोना संसर्गापासू कसा बचाव करायचा, कशा प्रकारे काळजी घ्यायची या सर्व गोष्टींचे घरगुती उपया सांगण्यात येत आहे.

गरम पाण्याची वाफ घेणे,  हळद टाकून दूध पिणे, गरम पाणि पिणे असे अनेक प्रकारचे उपय सांगण्यात येतात. अशातच एका महिलेने कोरोना या आजारापासून बचाव करण्यासाठी एक भयंकर उपाय शोधला आहे.

त्या महिलेने चक्क गाळीचे गोळे खात आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला खुर्चीवर बसली असून तिच्यासमोरील टेबलावर एक डीश ठेवली आहे. त्यामध्ये आगीचे गोळे असल्याचं दिसतं आहे.

ती महिला ते आगीचे गोळे एक झाल्याकी एक आपल्या तोंडात टाकत आहे. हे पाहताना आपल्याला भिती वाटेल. पण तिला ते आगीचे गोळे खाताना कोणतीच भिती वाटत नसल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटरवर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘वाफ घेतल्यानंतर, मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यानंतर, हळदीचे दूध प्यायल्यानंतर, दररोज गरम पाणी प्यायल्यानंतर आता हा शेवटचा उपाय राहिला आहे. कोरोना जिवंतच भस्म होऊन जाईल’ असं कॅप्शनही दिलं आहे.

तसेच तुम्ही मात्र असं करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त कोरोना लस , असा सल्लाही रूपिन शर्मा दिला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत खूप लोकांनी पाहिला असून अनेकांनी या व्हिडीओवर कमेंटही केल्या आहेत.


महत्वाच्या बातम्या-

पूलावर गाडी थांबवत महिलेनं असं काही केलं की पोलिसांनी केली…

चौघांबरोबर पाचव्यालाही गाडीवर बसवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल,…

धक्कादायक! संत्र्याच्या बागेत रुग्णांवर उपचार करत सलाईनमधून…

‘मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो’…

‘तुझ्या स्वभावातील कटुतेचीही टेस्ट करून घे’…