कंडोममध्ये सोनं घालून महिलांनी अशा जागी लपवलं की पाहून मुंबई पोलीसही चक्रावले!

मुंबई | चोरी करण्यासाठी चोरटे कोण्त्या मार्गाचा अवलंब करतील, याविषयी काही सांगता येत नाही. आजपर्यंत अनेक मोठमोठ्या चोरीच्या घटना उघड झाल्या आहेत. काहीवेळा तर चोरी करण्यासाठी चोरट्यांनी वापरलेल्या कल्पना आपल्याला हैराण करुन सोडतात. अशीच हैराण करुन सोडणारी चोरीची घटना मुंबई विमानतळावर देखील उघडकीस आली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई विमानतळावर अंमली पदार्थांच्या तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. देशासाठी हा एक गंभीर प्रश्न बनत चालला आहे. या तस्करींना आळा घालण्यासाठी एनसीबीचे अधिकारी आता पूर्ण कसोटीने प्रयत्न करत आहेत.

काही महिला आपल्या पॅंटमध्ये अंमली पदार्थ लपवून तस्करी करत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यामुळे एनसबीने मुंबई विमानतळावर कडक बंदोबस्त लावला होता. सर्व महिलांची कसून तपासणी केली जात होती.

ही तपासणी करत असताना तीन महिलांनी कंडोममध्ये सोनं लपवून आणल्याचं उघडकीस आलं आहे. या महिलांकडून तब्बल 50 लाखांहून अधिक किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. हे सोनं 1 किलोहून अधिक वजनाचं होतं.

सोनं लंपास करण्यासाठी या महिलांनी ज्या मार्गाचा अवलंब केला ते पाहून विमानतळावरील एनसीबी अधिकारी हैराण झाले होते. एनसीबीने या महिलांना कस्टम्सकडे सोपवलं आहे. सध्या या तिन्ही महिलांना गजाआड टाकलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही महिला मूळच्या केनियाच्या रहिवासी आहेत. केनियाहून या महिला कतारला गेल्या होत्या. यानंतर कतारहून त्या मुंबईमध्ये दाखल झाल्या होत्या. मात्र, महिला मुंबई पोलिसांनी या महिलांचा सर्व खेळ उघडकीस आणला.

महत्वाच्या बातम्या-

संतापलेल्या ऐश्वर्याने ‘या’ कारणाने अभिषेकला दोन रात्री ठेवलेलं रुमबाहेर

पाकने माधुरी दीक्षित यांना मागितल्यानंतर ‘शेरशाह’ बत्रांनी दिलेल्या उत्तराने शत्रू हादरले होते

नेहा कक्कर लवकरच ‘गुडन्यूज’ देणार? व्हिडीओतून झालं अघड

विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरंच विवाह बंधनात अडकणार? अभिनेत्रीची टीम म्हणाली…

‘कोणीतरी आम्हाला वाचवा!’; अमेरिकन सैन्यापुढे अफगाणी महिलेचा आक्रोश, पाहा व्हिडीओ