मुंबई | मनोरंजन विश्वातील सर्वच कलाकार आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून राहत असतात. प्रत्येक कलाकार आपल्या पात्राला उत्तम न्याय देऊन प्रेक्षकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. मग हे करण्यासाठी कलाकार काहीही करायला तयार असतात.
आपल्या पात्राला योग्य न्याय देण्यासाठी एक दक्षिणात्य अभिनेत्री चक्क सेटवरच न्यूड झाली होती. यावेळी त्या अभिनेत्रीने कोणताही स्किन कॉश्च्यूम देखील घातला नव्हता. यामुळे या अभिनेत्रीला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.
या दक्षिणात्य अभिनेत्रीचंं नाव आमला पॉल असं आहे. आमला दक्षिणात्य चित्रपटांतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तिने अगदी कमी वेळात साऊथ इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं आहे.
यावर्षी आमलाचा ‘अदाई’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी तिने पुरेपर प्रयत्न केले आहेत. अदाई चित्रपटामध्ये आमलाने एक न्यूड सीन दिला आहे.
या सीनसाठी आमला सेटवरच न्यूड झाली होती. यावेळी तिने कोणताच स्किन कॉश्च्यूम देखील घातला नव्हता. हा सीन शूट होताना सेटवर जवळपास 15 ते 20 लोक उपस्थित होते. मात्र, सीन खरा वाटावा म्हणून तिने न्यूड होऊन अभिनय केला.
ही बातमी व्हायरल झाल्यानंतर काहिंनी आमलाच्या धाडसाला दाद दिली होती. तर काही लोकांनी आमलाला ट्रोल केलं होतं. परंतु आमला आपण योग्य असल्याच्या भूमिकेवर ठाम राहिली.
या भूमिकेविषयी बोलताना आमला म्हणाली होती की, हा सीन देणं माझ्यासाठी देखील सोपं नव्हतं. परंतु या सिनेमाचं कथानक पाहून मी हा सीन देण्याचं धाडस केलं. यानंतर माझ्यावर टीका होणार हे मला माहित होतं परंतु सिनेमासाठी मला कोणतीही तडजोड करायची नव्हती.
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! भारतीने घटवलं तब्बल 15 किलो वजन, बदल पाहून चाहते आवाक्
संजय दत्तची मुलगी त्रिशाला करणार आपल्याच एका चाहत्यासोबत लग्न?
पती विरोधात दीपिकानं केली तक्रार, रणवीरने वचन तोडलं आणि…
…म्हणून मुलाच्या मृत्यूनंतर देखील सिद्धार्थची आई घेत आहे शेहनाजची काळजी
‘जराही लाज वाटत नाही का?’, अंडरवियर जाहिरातीमुळे वरुण धवन वादाच्या भोवऱ्यात