बोंबला! चालू विमानात दारू न मिळाल्यानं ‘या’ मॉडेलने क्रू मेंबरला मारहाण केली अन्…

नवी दिल्ली | दारूची नशा करणाऱ्या लोकांसाठी दारू म्हणजे जीव की प्राण असतो. प्रसंगी स्वतःच जीव धो.क्यात आला तरी चालेल. मात्र, या लोकांना दारू हवी असते. दारूसाठी हे लोक काहिही करी शकतात. सध्या अशीच काहीशी घटना न्यूझीलंडमध्ये घडली आहे.

न्यूझीलंड मधील एका मॉडेलने चालू विमानात वाईनची मागणी केली. मात्र क्रू मेंबर्सने तिला वाईन देण्यासाठी नकार दिला. यानंतर या मॉडेलने चालू विमानात गोंधळ उडवून दिला.

माहितीनुसार, या इन्स्टाग्राम मॉडेलचं नाव हन्ना ली पिअर्स असं आहे. काही क्रू मेंबर्स विमानातील प्रवाशांना जेवण देत होते. क्रू मेंबर्स हन्नाला जेवण देऊ लागल्यानंतर तिने क्रू मेंबर्सला वाईनची मागणी केली.

यावेळी क्रू मेंबर्सने हन्नाला सांगितले की, वाईन जेवणासोबत येत नाही. जर तुम्हाला वाईन हवी असेल तर त्याचे वेगळे पैसे द्यावे लागतील. क्रू मेंबर्सने असं सांगताच हन्ना खूप चिडली आणि ती चालू विमनात गोंधळ घालू लागली.

हन्ना यावेळी विमानातील क्रू मेंबर्सला म्हणाली की, मला ठाऊक आहे जेवणासोबत काय मिळतं आणि काय नाही मिळत ते? मला फक्त वाईन हवी आहे. मला वाईन आणून द्या. मला जर वाईन नाही मिळाली तर मी हे विमान उडवून देईल.

यावेळी हन्ना ली पिअर्सने क्रू मेंबर्सला अश्लील शब्दांमध्ये शि.वीगाळ देखील केली. हन्नाने प्लेनमध्ये गोंधळ घातल्यानंतर सर्व प्रवासी देखील खूप घाबरले होते. यानंतरही क्रू मेंबर्सने हन्नाला वाईन देण्यासाठी नकार दिला.

मग हन्नाने क्रू मेंबर्सपैकी एकीचा हात पकडला आणि तिला मारण्याचा प्रयत्न करू लागली. यावेळी इतर क्रू मेंबर्सने हस्तक्षेप करत त्या क्रू मेंबरची सुटका केली. यावेळी प्लेनमध्ये काही काळ खूप गरम वतावरण होतं.

यानंतर क्रू मेंबर्सने हन्नाचे हात एका रस्सीने बांधले आणि तिला सीट बेल्टने एका सीटला बांधून ठेवले. क्रू मेंबर्ससोबत गैरवर्तन केल्याने आणि प्लेन उडवण्याची ध.मकी दिल्याने एअर न्यूझीलंडने हन्ना ली पिअर्स विरोधात के.स दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

आता तुम्ही तुमचं आधार, पॅन कार्ड ‘या’ पद्धतीने लिंक करू शकता, वाचा सविस्तर

…म्हणून स्वरा भास्कर झाली भावुक, पाहा व्हिडीओ

प्रियंका चोप्राच्या बिकिनी अवतारात दिसली राखी सावंत, पाहा…

प्रेग्नेंसीमध्ये अभिनेत्री दिया मिर्झा अशी घेतेय स्वतःची…

विमानात प्रवासादरम्यान तरूणाने असं काही केलं की, तातडीने…