टोल नाक्यावर गाडी आडवली म्हणून थोबाडीत मारली; ‘या’ महिला नेत्याच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल

अमरावती |  टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांसोबत दादागिरीच्या घटना काही नवीन नाहीत. अनेकवेळा टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक दिली जाते, त्यांना शिवीगाळ केली जाते. यापूर्वी देखील अशा बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. मात्र, अशातच आता टोल कर्मचार्यांसोबत एका महिला नेत्याच्या दादागिरीचा व्हिडिओ समोर आला आहे.

वायएसआर काँग्रेसच्या एका महिला नेत्याने टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांनी गाडी आडवली म्हणून गाडीतून थेट खाली उतरून बॅरीकेट्स हटविले. यानंतर कर्मचाऱ्याच्या थोबाडीत मारली आणि गाडी घेवून तिथून निघून गेल्या. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ही घटना आंध्र प्रदेश मधील आहे. टोल कर्मचाऱ्यांसोबत दादागिरी करणारी ही महिला आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्षाच्या म्हणजेच वायएसआर काँग्रेसच्या महिला नेत्या डी. रेवती या आहेत.

टोल नाक्यावर डी. रेवती यांची गाडी आडवली. यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी त्यांना टोल टॅक्सची विचारणा केली. टोल टॅक्स विचारल्यानंतर डी. रेवती यांचा राग अनावर झाला. त्या गाडीतून खाली उतरल्या आणि थेट कर्मचाऱ्यांशी उर्वाच्च भाषेत बोलू लागल्या.

यानंतर त्या टोल नाक्यावर लावलेल्या बॅरीकेट्स हटवू लागल्या. कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी एका टोल कर्मचाऱ्याच्या थेट कानाखाली वाजवली. यानंतर त्या गाडीत बसून विना टोल भरता थेट निघून गेल्या.

दरम्यान, या प्रकरणी आंध्र प्रदेश पोलिसांकडे डी. रेवती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणात आला आहे. टोल कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्याचा आणि त्याच्यावर हात उचलण्याचा आरोप डी. रेवती यांच्यावर करण्यात आला आहे. मात्र, रेवती यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘UPA प्रमुख म्हणून माझी निवड होणार..’; UPAच्या अध्यक्ष पदावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य!

शरद पवार UPAचे अध्यक्ष होणार? आता ‘या’ बड्या कॉंग्रेस नेत्याचं थेट वक्तव्य, म्हणाले…

‘पवार साहेब मुख्यमंत्री असतानाच…’; UPAच्या अध्यक्ष पदासाठी शरद पवारांचं नाव येताच अजित पवारांचं मोठं वक्तव्य!

केंद्र सरकारची जबरदस्त योजना! देशात सर्वत्र उपलब्ध होणार ‘फ्री वाय फाय’

सर्वात मोठी बातमी! सोनिया गांधी रिटायरमेंट घेत कॉंग्रेसचं अध्यक्षपद पवारांकडे सोपविणार?