जोरजोरात ओरडत ‘या’ महिलेने शोकसभेतच काढले कपडे; व्हिडीओ व्हायरल

विंडसर | सोशल मीडियामुळे जग खूप जवळ आलं आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली कोणतीही गोष्ट क्षणार्धात आपल्यापर्यंत पोहोचते. तसेच रोजच सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपल्याला आश्चर्यचकित करून सोडणारे असतात.

सध्या सोशल मीडियावर असाच ब्रिटनमधील एका महिलेचा आश्चर्यचकित करून सोडणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका शोकसभेदरम्यानचा आहे. एका महिलेने शोकसभेच्या वेळी चांगलाच गोंधळ उडवून दिला असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

माहितीनुसार, ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स फिलिप यांचं नुकतंच नि.धन झालं आहे. प्रिन्स फिलिप यांच्या अंत्यसंस्कारावेळी या महिलेने चांगलाच गोंधळ उडवून दिला. या महिलेने भरसभेत रस्त्यावर कपडे काढत धावण्यास सुरुवात केली. यामुळे उपस्थित सर्वचजण आश्चर्यचकित झाले.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, प्रिन्स फिलिप यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी एक शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेसाठी भरपूर लोक उपस्थित आहेत. यावेळी पोलिसांचा देखील बंदोबस्त करण्यात आला आहे.

सेंट जॉर्ज चॅपलच्या आतमध्ये शोकसभेची बैठक चालू होती आणि त्यावेळी एक मिनिटासाठी मौन बाळगण्यात आलं होतं. यावेळी अचानक ही महिला मोठमोठ्याने ओरडत पळू लागली. ही महिला राजवाड्याच्या गेटपासून रस्त्यापर्यंत पळत आली. काही क्षणासाठी तर तिथे कोणाच्याच लक्षात आलं नाही की, नेमकं काय चाललं आहे?

ही महिला रस्त्यावरुन पळत असताना अचानक ती कपडे देखील काढू लागते. ती यावेळी ‘सेव्ह द प्लॅनेट’चा नारा देते. पोलीस देखील त्या महिलेला वाचवण्यासाठी तिच्या पाठीमागे धावू लागतात. यावेळी ही महिला पूर्ण टॉपलेस झालेली असते.

पोलीस या महिलेच्या मागे धावत असताना ही महिला तेथील राणी व्हिक्टोरियाच्या पुतळ्यापाशी चढून देखील ‘सेव्ह द प्लॅनेट’चा नारा देते. यानंतर पोलीस या महिलेच्या अंगावर एक पांढरं कापड टाकतात आणि तिला ताब्यात घेतात. तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांसाठीच ही एक धक्कादायक बाब होती.

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. अनेक वृत्त माध्यमांनी याविषयी वृत्त दिली आहेत. मात्र, या महिलेनं नेमकं असं का केलं? यामागचं कारण अद्याप समजू शकलं नाही.

महत्वाच्या बातम्या –

सोनं पुन्हा प्रतीतोळा 56 हजारापार जाणार? गेल्या 15 दिवसांत सोन्याच्या दरात 6 टक्क्यांनी वाढ

भारतातील सर्व नद्यांना स्त्री समजलं जातं, मात्र ‘या’ एकमेव नदीला पुरुष समजलं जातं; वाचा काय आहे कारण?

फडणवीसांचा मध्यरात्रीचा पोलीस स्टेशनमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानं खळबळ; पाहा व्हिडीओ

लज्जास्पद! ‘माझ्या आईला वाचवा डॉक्टर’; मुलांच्या आर्त हाकेनंतरही डॉक्टरनं उपचार नाही केला; व्हिडीओ व्हायरल

भर रस्त्यात चालू कारमधून बाळ खाली पडलं, आई मात्र गाडी चालवत पुढे गेली अन् मग…; पाहा व्हिडीओ