नवी दिल्ली : भारताचा युवा क्रिकेटपटू ऋषभ पंत अगदी थोड्या कालावधीत एकदम प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्याचे अनेक चाहते तयार झाले आहेत. स्टायलिश आणि हटके अंदाजामुळे अनेक तरूण मुलीही ऋषभ पंतच्या चाहत्या झाल्या आहेत. खरंतर गेल्या काही दिवसांपासून ऋषभ पंतची बॅट मैदानावर तळपलेली नाही. तरीही त्याच्या चाहत्यांमध्ये किंचितही घट झालेली नाही.
काही दिवसांपूर्वीच मैदानावरील सरावावेळी एका २१ वर्षांच्या तरुणीने सगळ्यांसमोर ऋषभ पंतला प्रपोज केलं. एकदम अचानक झालेल्या या गोष्टीमुळे ऋषभ लाजला गेला.
बंगळुरूमधील तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी ऋषभ पंत मैदानावर आपल्या चाहत्यांना स्वाक्षरी देत होता. स्वाक्षरी देताना त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. पण त्याचवेळी चाहत्यांच्या गराड्यात एका तरुणीचा आवाज ऐकायला मिळाला. या चाहतीने सगळ्यांसमोर ऋषभला ‘आय लव्ह यू ऋषभ’, असं प्रपोज केलं आहे.
तरुणीच्या त्या आवाजामुळे ऋषभ पंत एकदम गोंधळून गेला. त्याचवेळी अचानक झालेल्या या प्रकारामुळे त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते पण तो लाजला असल्याचेही जाणवत होते. सोशल मीडियावर सध्या ऋषभ पंत लाजल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
दरम्यान, ज्या तरुणीने ऋषभ पंतला प्रपोज केलं होतं. तिनेच आपल्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ प्रसिद्ध केला असल्याचं समजतंय.
महत्त्वाच्या बातम्या –
आमीर खानच्या लेकीचा बोल्ड अंदाज; सोशल मीडियावर फोटो व्हायरल – https://t.co/VexeJZDkrY @aamir_khan
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरु; उमेदवारीवरुन काही नेत्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी! https://t.co/lhhqR7QpTQ @INCMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
आणखी एका तरूणीला शरद पवारांनी दिला आशीर्वादhttps://t.co/eZfLKVwQMa @KalpitaRamesh @NCPspeaks @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019