चक्क घरात शिरून तरूणाने केली विधवा महिलेकडे शरिरसुखाची मागणी अन्…

अमरावती | सगळीकडे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. दररोज हाणामारी, हत्या केल्याच्या घटना घडल्याचं कानावर येतं असतं. यामुळे समाजात हिंसक वातावरण निर्माण होत चालल आहे.

महिलांवर बलात्कार होणं, त्यांचा छळ करणे अशा अनेक प्रकारच्या घटना राज्यात वारंवार घडत आहेत. अशातच अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली असल्याची माहीती समोर आली आहे.

एका तरूणाने विधवा महिलेच्या घरात शिरून शरिरसुखाची मागणी केली. तसेच तरूणाने विधवा महिलेकडे वाईट नजरेने बघून विनयभंगही केल्या असल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे अमरावती परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना सिटी कोतवाली ठाण्यांतर्गत मसानगंज येथे मंगळवार 4 मे रोजी घडली आहे. या घटनेविरोधात विधवा महिलेने स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली आहे. महिलेने सांगितलेल्या माहितीवरून या प्रकारणाविरोधात आरोपी आनंद प्रीतम ओरिया याला अटक केलं आहे.

तसेच आनंद प्रीतम याच्याविरुद्ध भादंविचे कलम 452, 354, 354(अ), 354(ड), 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, विधवा महिला आपल्या चुलत सासऱ्यांच्या घरात राहत होती. या महिलेचे पतीचे निधन 2014 साली झाले होते. महिला आपल्या मुलासह घरात झोपली होती. घरातला दरवाजा तुटल्यामुळे त्याला पडदा लावला होता.

आरोपीने रात्री अडीच वाजत्याच्या सुमारास घरात शिरून महिलेकडे शरिर सुखाची मागणी केली. त्यानंतर महिलेने आरोपी आनंद प्रीतमला नकार केली असता, त्याने तिला मारहाण व शिवीगाळ करून मारण्याची धमकीसुद्धा दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसून, उर्वरित तपास पीएसआय श्रीकांत नारमोड करीत असल्याची समजलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

यवतमाळमध्ये एकच खळबळ! तरूणीने रचला प्रियकाराच्या मदतीने…

ह्रदयद्रावक! कोरोना झालेल्या वडिलांना पाणी पाजण्यासाठी…

तेरा साथ ना छोडेंगे! नवऱ्याच्या मृतदेहाला मिठी मारुन…

काळजाला हेलावून टाकणारी घटना! कोरोनामुळे एकुलत्या एक मुलाचा…

कौतुकास्पद! आई-पत्निचे दागिने गहाण ठेवत पुण्यात उभारलं…