आनंद पोटात माझ्या मावेना! कोरोनाचा दुसरा डोस मिळाल्यानं तरूणाने अशाप्रकारे केला आनंद व्यक्त, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली |  गेल्या काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

कोरोना महाआजाराशी सामना करण्यासाठी संपूर्ण जगभरात लसीकरणाला सुरूवात झाली आहे.  कोरोना लसीचे दोन डोस टप्या-टप्याने घ्यायचे आहेत. कोही लोकांचे दोन्ही डोस घेतले आहेत. कोरोना लस घेतली की सगळे लोक लस घेतल्याचा फोटो आपल्या व्हॉटसअॅप स्टेटसवर ठेवतात.

प्रत्येकजण आप-आपला आनंद वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा करत असतं. कोणी देवासमोर पेढे ठेऊन करतं, तर कोणी नाचत-बागड करत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील तरूणाने आपल्याला कोरोना लसीचा दुसरा डोस मिळाला असल्याने त्यांने चक्क डान्स करत आपला आनंद व्यक्त केला आहे. कॅनडातील एका तरूणाने लसीचे दोन्ही डोस घेतल्याच्या खूशीत त्याने भांगडा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कॅनडात राहणारा भांगडा कलाकार गुरदीप पंधेर यांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर डान्स करून आनंद व्यक्त केला होता. त्यावेळीही त्यानी सोशळ मीडियावर तो व्हिडीओ शेअर केला होता. तसेच आता गुरदीपने कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला असून, यावेळीही त्यांनी डान्स करत तो आनंद व्यक्त केला आहे. मागच्या वेळेप्रमाणे आताही त्यांना आपल्या ट्विटर आकाऊंटवरून तो व्हिडीओ  शेअर केला आहे.

गुरदीप व्हिडीओमध्ये खूपच आनंदात दिसत आहे. तो बर्फावर डान्स करताना दिसत आहे. गुरदीप ने हा व्हिडीओ पोस्ट करताना ‘मला कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस मिळाल्यानंतर मी गोठलेल्या तलावावर म्हणजे निसर्गाच्या कुशीत गेलो आणि पंजाबी भांगडा केला. माझा आनंद, आशा आणि सकारात्मकता जगापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हे केलंय. कॅनडा आणि जगातल्या प्रत्येकापर्यंत मला ही सकारात्मक उर्जा पोहोचवायची आहे.’ असं म्हटलं आहे.

गुरदीप चा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, या व्हिडीओला त्याला अनेक वेगवेगळ्या कमेंटही येत आहेत. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ आतापर्यंत जवळपास 3 लाख लोकांनी पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्रेरणादायी! तरूणाने केलं असं काही की, पाहा व्हिडीओ

सुशांतपूर्वी रिया… ‘या’ प्रसिद्ध…

आर्चीनं ‘या’ गाण्यावर केला बिनाधास्त डान्स; पाहा…

‘ये लाल इश्क, ये मलाल इश्क!’ ‘या’…

‘धर्म म्हणजे काय मला शिकवू नका’;…