गल्लीतील दोन महिलांच्या भांडणामध्ये पडला तरूण अन्…, पाहा मजेशीर व्हिडीओ

नवी दिल्ली | आपल्याला माहित आहे की, घरा शेजारी घर असलं की, भांड्याला भांड हे लागतंच. कोणत्याना कोणत्या कारणावरून शेजारी राहत असलेल्या लोकांबरोबर आपली एकदा तरी भांडण ही होतच असतात.

तसेच सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात. तर त्यातील काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात.

यामध्ये काही व्हिडीओ हाणामारीचेही असतात. त्यामध्ये काही वेळा दोन माणसांची भांडणं आपण अनेकदा पाहिली असतील. परंतू याआधी तुम्ही कधी दोन महिलांची भांडण पाहिली आहेत का?. नसेल पाहिली तर सध्या याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये दोन महिला एकमेकींसोबत खूप जोर-जोरात भांडत असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्या एक गल्लीमध्ये राहत असून, त्या दोघीचं घरंही एकमेकींशेजारी असल्याचं समजतं आहे.

एक महिला दुसऱ्या महिलेच्या दारापुढे घाण टाकत आहे. तर दुसरी महिलाही दुसरीच्या दारापुढे कचरा टाकत आहे. त्यांची ही भांडण पाहण्यासाठी त्या ठिकाणी राहत असलेले अनेक लोकही जमले असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.

काहीवेळ असंच सुरू असल्यानंतर त्या दोघी एकमेकींच्या घरात त्या ठिकाणी असलेल्या गटारीतील घाण टाकायला लागल्या. त्या हे करत असतानाही एक तरूण त्यांच्यामध्येच उभा राहिला आहे. त्यानंतर एक महिला दुसरीच्या घरात घाण टाकायला जाते, तर त्या मध्ये उभा असलेल्या तरूणाच्याच अंगावर पडते.

हे पाहून त्या ठिकाणी असेलेली लोक त्याच्यावर खूप मोठंमोठ्यानं हसत असल्याचंही पाहायला मिळतं आहे. तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला असल्याचं समजतं आहे.

https://www.instagram.com/p/CUxOAXAvqcn/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

महत्वाच्या बातम्या-

“तृप्ती देसाई सुद्धा मला भिडताना विचार करुन भिडायच्या”

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी!

‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

“वारकरी सांप्रदायाचा पाठिंबा म्हणजे साक्षात विठोबा-रखमाईचे आशीर्वादच”

“आई-वडिलांनी बिग बॅासमध्ये जाऊ नको म्हणून सांगितलं होतं, पण…”