कोरोनाचे नियम मोडून पोलीसांशीच वाद घालू लागली तरूणी, पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई| कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं अक्षरशः तांडवच बघायला मिळत आहे. देशाच्या विविध भागात कोरोनाने हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांवर परिणाम होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं अक्षरशः तांडवच बघायला मिळत आहे. देशाच्या विविध भागात कोरोनाने हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे.

अशातच अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं समोर आलं आहे. बिहारमध्ये सध्या लॉकडाऊन असून अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. येथे एक तरुणी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वाद घालत असल्याचं दिसून आली.

पोलिसांनी लोकांना कोविडची नियमावलीचं कडक पालन करण्याचं आवाहन केलं आहे. पाटनामध्ये हेल्मेट न घालता स्कूटी चालविणाऱ्या एका तरुणीला पोलीस कर्मचाऱ्यांनी थांबवलं तर ती त्यांच्याच सोबत वाद घालू लागली.

तरुणी म्हणाली की, जर तिचं चालान कापलं तर संपूर्ण बिहारमध्ये गोंधळ उडेल. त्यानंतरही ती पोलिसांनी उलट सुटल बोलत राहिली. येथे लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे आणि तुम्हाला हेल्मेटची काळजी आहे, असं म्हणत तिने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त बाहेर जाण्यास मनाई आहे आणि त्यांनी प्रोटोकॉल तोडल्यामुळे त्यांचं चालान कापलं जाईल. यावर तरुणी धमकी देत म्हणाली, की माझं चालान कापलं तर सर्वांची नोकरी जाईल. तरुणी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीन कुमार यांच्यासाठीही अभद्र शब्दाचा वापर करीत होती.

तरुणी म्हणत होती, की सरकार विचार न करता लॉकडाऊन लावत आहे. यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तरुणीचं म्हणणं आहे की, तिला रात्री 11 वाजताची ट्रेन पकडायची आहे. मात्र यासाठी ती गेल्या तीन तासांपासून वाहन शोधत होती. त्यामुळे स्टेशनवर जाण्यासाठी तिने टू व्हिलर काढल्याचं सांगितलं.

तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, सध्या वेळ कठिण आहे, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनालाही मदत केली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणे हीच काळाची गरज बनली आहे. कोरोना लढाईत आपण सगळे एकत्र आहोत असे म्हणत अनेक लोक कोरोना काळात मदत करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

इन्स्टाग्रामनं डिलीट केली ‘ती’ वादग्रस्त पोस्ट,…

‘सगळे पुरूष एकसारखेचं असतात?’ म्हणत मीरा…

लॉकडाऊनचं पालन करण्यासाठी नवरदेवाची वरात काढली थेट मक्याच्या…

अवघ्या 24 तासात विराट-अनुष्काकडून कोरोनाग्रस्तांसाठी…

कौतुकास्पद! 9 वर्षाच्या ‘या’ चिमुकलीनं देश…