तरुणी उंटासोबत सेल्फी काढायला गेली अन् उंटाने केस धरून तिला…; पाहा व्हिडीओ

मुंबई | सेल्फी काढण्याची आवड आपल्यापैकी अनेकांना असते. सेल्फी काढण्याच्या मोहामुळे अनेक गंभीर दुर्घटना घडल्याचं तुम्ही देखील नक्कीच ऐकलं असेल. मात्र, तरी देखील लोक सेल्फी काढणं सोडत नाहीत. पुढे जरी धोका दिसत असेल तरी देखील सेल्फी प्रेमींना तिथे सेल्फी काढायचीच असते.

सेल्फी काढताना घडलेल्या दुर्घटनांचे अनेक व्हिडीओज आजवर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील सेल्फी काढताना सावध व्हाल.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक महिला प्राणी पाहण्यासाठी प्राणी संग्रहालयात गेली आहे. ही महिला प्राणी संग्रहालयात एका उंटासोबत सेल्फी काढताना दिसत आहे.

पण उंटासोबत सेल्फी काढणं या महिलेच्या चांगलंच अंगलट आलं आहे. उंटासोबत सेल्फी काढताना ही महिला उंटाकडे पाठ करून उभी राहते. त्याचवेळी हा उंट त्या महिलेचे केस आपल्या तोंडात पकडतो आणि खाऊ लागतो.

या उंटाला कदाचित खूप भूक लागली असावी. आणि त्या महिलेचे केस म्हणजे उंटाला एखादी खाण्याची गोष्ट वाटत असावी यासाठी तो उंट महिलेचे केस ओढून खाऊ लागतो. यानंतर ती महिला खूप मोठ्याने ओरडते.

परंतु उंट महिलेचे काही केस तोडून खाऊ लागतो. यानंतर ती महिला तिथून लांब सरकते. शेजारीच असणाऱ्या काही लोकांच्या मोबाईलमध्ये ही घटना कैद होते आणि सध्या सोशल मिडियावर हाच व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या – 

कोंबडी पाठीवर असताना मगरीने अचानक जबडा उघडला अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

…अन् मलायका पँट न घालताच टेबलवर येऊन बसली; मलायकाने शेअर केला तो भन्नाट किस्सा

जाणून घ्या! चणे खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त प्रशासनाने जारी…

अॅंकरने हिंदी भाषेचा वापर केला म्हणून ‘या’…