सॉल्ट लेक सिटी | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात. तर काही व्हिडीओ असे असतात की, त्यांना पाहिल्यावर आपल्या अंगावर लगेच काटा उभा राहिल.
या पूर्वी तुम्ही हाणामारी, भांडणांचे व्हिडीओ पाहिले असतील. त्यामध्ये माणसा-माणसांमधील भांडण पाहिली असतील. तसेच तुम्ही दोन प्राण्यांमधील हाणामारीचेही व्हिडीओ पाहिले असतील. परंतू काय तुम्ही प्राणी आणि माणसांमधील भांडणाचा व्हिडीओ पाहिला आहे का?.
नसेल पाहिला तर आता पाहा. सध्या याच संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मगरीने थेट एका तरूणीवर हल्ला चढवला आहे. हा व्हिडीओ एका प्राणी संग्रालयातील असल्याचं समजतं आहे.
सुरूवातीला या व्हिडीओमध्ये त्या प्राणी संग्रालयामध्ये काही लोक प्राणी बघायला आले असल्याचं दिसून येतं आहे. एका मोठ्या पाण्याच्या टबमध्ये एक मोठी मगर ठेवली आहे. तिला त्या ठिकाणी आलेले लोक पाहत आहेत. एवढ्या लोकांना पाहून मगर पाण्याच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करते.
मगर पाण्याच्या बाहेर येऊ नये यासाठी त्या ठिकाणी असलेली एक केअर टेकर येते आणि मगरीला आत ढकलते. हे करत असताना ती मगर त्या मुलीचा हात आपल्या जबड्यात धरते. सुरूवातीला कोणालाच काही कळत नाही. त्यानंतर ती मगर तिला पाण्यात ओढते आणि तिचा हात खूप जोरात आपल्या दातांनी धरून ठेवते.
हे पाहून त्या ठिकाणचे लोक आरडा-ओरडा करू लागतात. हे पाहून संग्रहालयातील काही लोक तिची मदत करण्याचा प्रयत्न करतात. परंतू मगर ती मगरच. मगर त्या मुलीचा हात सोडायला तयारच नसल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.
मात्र काही काळानंतर मगर आपल्या जबड्यात धरलेला त्या तरूणीचा हात सोडते. मगरेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
नवरीने असं काही केलं की नवरदेवानं भर लग्नात वरमाळ दिली फेकून, पाहा व्हिडीओ
कचरा गोळा करणाऱ्या महिलेचं इंग्लिश ऐकून तुम्हीही व्हाल चकीत, पाहा व्हिडीओ
‘मीच माझ्या रूपाचा राजा’; म्हणत कुत्रा आरशात पाहून करतोय नखरे, पाहा व्हायरल व्हिडीओ
काय सांगता! चक्क बिबट्याने ‘या’ प्राण्यासमोर घेतली माघार, पाहा व्हिडीओ
‘हा’ व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रांनी केले काही सवाल, पाहा व्हिडीओ