धक्कादायक! छोट्या भावाने बहिणीला भररस्त्यात चाकूने भोसकलं; पाहा व्हिडीओ

सुरत | अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं काही सर्व्हे सांगतात. पोलिसांविषयी जराही भीती न बाळगता गुन्हेगार खुलेआम गुन्हे करताना आढळतात. सध्या गुजरातच्या कच्छ मधील मुंद्रा शहरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंद्रा येथील एका छोट्या भावाने आपल्या बहिणीची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या केली आहे. प्रेमसंग टंक असं या आरोपीचं नाव आहे. तिथे उपस्थित असणाऱ्या काही लोकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे.

आरोपी प्रेमसंग याला आपली 22 वर्षीय बहिण रिना हिच्या अफेअरविषयी माहिती मिळली होती. यानंतर प्रेमसंगने आपल्या बहिणीला मारण्याचा खूप प्रयत्न केला. पण रिना आपला जीव वाचवून पळत सुटली.

मात्र, रिनाचा पाठलाग करत प्रेमसंगने 8 ते 10 वेळा भररस्त्यात तिच्यावर चाकूने वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी आसपासचे लोक प्रेमसंगला रोखण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्याने कोणाचंही ऐकलं नाही.

बहिणीची हत्या केल्यानंतर प्रेमसंग रस्त्यातच जोरजोराने ओरडू लागला. मी माझ्या बहिणीचा जीव घेतला आहे. मी कोणालाच घाबरत नाही, असं तो आसपास असणाऱ्या लोकांना बोलू लागला.

यावेळी आजूबाजूला असणारे लोक प्रेमसंगला तू कुठेही पळून जाऊ नको जागीच थांब, असं ओरडून सांगत होते. तो देखील जागेवरंच उभा राहिला. काही वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर प्रेमसंगने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या काही लोकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. लोक या भावाल कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी करत आहेत.


महत्वाच्या बातम्या-

“देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये, केंद्रातील कुंभकर्ण सरकारला केव्हा जाग येणार?”