देशातील सर्वात लहान कोरोना योद्धा! 10 दिवसांत चिमुकलीनं केली कोरोनावर मात, डाॅक्टर म्हणाले…

नवी दिल्ली| कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तर मृत्युचे तांडवच चालवले आहे.

अशातच आकाशवाणीच्या भुवनेश्वर केंद्राने बातमी दिली आहे की भुवनेश्वर येथील एका एक महिन्याच्या चिमुकलीनं कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

भूवनेश्वरच्या एका हॉस्पिटलमध्ये या नवजात मुलीवर कोरोनाचे उपचार सुरू होते. 10 दिवसात या चिमुकलीने कोरोनावर मात केली असून ही चिमुकली कोरोनाला हरवणारी देशातील सर्वात लहान कोरोना वॉरियर बनली आहे.

लहान मुलगी मागील 10 दिवसांपासून व्हेटिंलेटर होती. याविषयी डॉ. अरिजीत महापात्रा म्हणाले की, या मुलीवर रेमडेसिवीर, स्टेरयेड आणि विविध प्रकारचे उपचार करण्यात आले. 2 आठवडे तिच्यावर उपचार करण्यात आले. आता मुलगी पूर्णपणे बरी आहे. लवकरच तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केले जाईल. हे चमत्कारापेक्षा कमी नाही असं डॉक्टर म्हणाले.

या चिमुकलीचे अद्याप बारसेही झालेले नाही. त्यामुळे आम्ही तिला गुडीया नावाने हाक मारत आहोत आणि तिच्यावर व्हेंटिलेटर लावले असतानाचा व्हिडीओ ट्विटर वर व्हायरल झाला आहे हा व्हिडीओ देशभर लोक शेअर करत आहेत.

दरम्यान, देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा तुटवडा सध्या भासतोय. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. अशा संकट काळात अनेक लोक पुढे येत सढळ हातानं मदत करत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या – 

कौतुकास्पद! चिमुकल्यानं सायकलसाठी जमवलेले खाऊचे पैसे दिले…

धक्कादायक! कार खरेदी करण्यासाठी आई-वडिलांनी आपल्या नवजात…

चक्क कोंबडाही बोलतोय अल्लाह अल्लाह; पाहा व्हायरल होणारा…

कोरोना झालेल्या आईला कोणीही खांदा द्यायला तयार नाही म्हणून…

कौतुकास्पद! पुण्यातील भाजी विक्रेत्या आजीने केली…