दिल्लीतील सिव्हिल डिफेन्सच्या जवानाला भररस्त्यात मारहाण…; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | अलिकडच्या काही वर्षांमध्ये पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांवर हल्ले झाल्याच्या अनेक घटना सतत समोर येत असतात. देशांतर्गत हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. याचे कित्येक व्हिडीओ देखील आजवर समोर आले आहेत.

सध्या अशीच आणखी एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. मास्क न लावल्याने दिल्ली सिव्हिल डिफेन्सच्या एका जवनाने तरुणाला हटकल्याने तो तरुण जवाणावर भररस्त्यात धावून गेला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक रस्ता गाड्यांनी भरून वाहत आहे. रस्त्यावर फूल गर्दी असताना देखील एक तरुण मास्क काढून रस्त्याने चालला आहे. यामुळे दिल्ली सिव्हिल डिफेन्सचा एक जवान त्या तरुणाला मास्क लावण्यास सांगतो.

जवानाने हटकल्याने मास्क न लावलेला तरुण तावातावाने जवनाच्या अंगावर धावून येतो. तो तरुण जवानाची मान पकडून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. तो जवानाला पाठीमागच्या बाजूला ढकलून देतो.

घटनास्थळी उपस्थित असणारे इतर जवान या तरुणाला शांत करण्याचा प्रयत्न करतात. परंतु तो तरुण त्यांच्या देखील अंगावर धावून जातो. यावेळी तो या जवानांना मोडून ठेवील, अशी धमकी देखील देतो.

तिथेच उपस्थित असणारा एक जवान ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद करतो. सध्या हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी या तरुणाविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

दरम्यान, जनतेच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या जवानांवर हल्ला होणे ही एक गंभीर समस्या होत चालली आहे. या गोष्टीची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील तरुणाला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नेटकरी करत आहेत.

https://www.facebook.com/100019374282401/videos/577737673254861/

महत्वाच्या बातम्या-

माकडासोबत फोटो काढायला गेला अन् घडला भयानक प्रकार; पाहा व्हिडीओ

…म्हणून करीना-दीपिका नव्हे तर कंगना करतेय ‘द इनकारनेशन सीता’मध्ये मुख्य भूमिका

‘…अन् रात्री झोपताना कोणीतरी माझा गळा दाबायचं’; हेमा मालिनींनी सांगितला भयाण किस्सा!

‘करिश्माने माझ्याशी फक्त पैशासाठी लग्न केलं’; पतीच्या गंभीर आरोपानंतर करिश्माने…

भर कार्यक्रमात मिका सिंगने राखीसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा!