‘…मग ठाकरे सरकारविरुद्ध आंदोलन करा’; राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य!

मुंबई |  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल ठाण्यामध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह अनेक नेते उपलब्ध होते. या मेळाव्याला राष्ट्रवादी नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. यावेळी आव्हाड यांनी चौफेर फटकेबाजी केली आहे.

केंद्र सरकारवर आपला जोरदार हल्ला झाला पाहिजे. त्याचबरोबर राज्यात जरी आपली सत्ता असली तरी राज्य सरकारचे काही निर्णय चुकत असतील तरी देखील आपण राज्य सरकार विरोधात आंदोलन केलं पाहिजे, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केलं आहे.

तसेच आव्हाड यांनी यावेळी ईडीने एकनाथ खडसेंना पाठवलेल्या नोटीस बद्दल देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. खडसे यांना मिळालेल्या ईडीच्या नोटीसवर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळेच त्यांच्यावर ईडीची चौकशी लावण्यात आली आहे.

इतकी वर्ष चौकशी लागली नाही आणि आता अचानक कशी काय लागली?  एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश हेच यामागील एकमेव कारण आहे.

दरम्यान, सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. या वर्षाच्या शेवट म्हणजे 30 डिसेंबरला खडसे यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर रहावं लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ईडीच्या नोटीसवर बोलताना काल एकनाथ खडसे म्हणाले की, ईडीची नोटीस आल्यानंतर मला संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येत आहेत. लोक सहानभूती व्यक्त करत आहेत. लोकांना हे आवडत नाही.

तसेच लोकांना असं वाटत आहे की, हा माझ्यावर एक प्रकारचा अन्याय होत आहे. वारंवार चौकश्या होणं लोकांना आवडलेलं दिसत नाही. मात्र, काही निर्णय असतात त्या आधीन राहूनच काम करायचं असतं.

एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर राज्यभरातून केंद्र सरकार विरोधात विविध प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सीबीआय आणि ईडीला कोर्टात खेचण्याचा पवित्रा उचलला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

स्वस्तात सोनं खरेदी करायचं आहे, तर मग हीच आहे सुवर्णसंधी! 28 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंतच आहे ‘ही’ योजना

‘केंद्रातील पथक चौकशीसाठी येतं, पाहणीसाठी नाही’; केंद्रीय पथकाविषयीच फडणवीसांचा मोठा खुलासा!

ईडीच्या नोटीसनंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नोटीसवर दुजोरा देत म्हणाले…

“इतर पक्षातील आमदार घेताना उकळ्या फुटत होत्या, बरं वाटत होतं, आता कसं वाटतंय?”

नवीन वर्षात प्रत्येक आठवड्याला वाढणार गॅस सिलिंडरचा दर? वाचा सविस्तर