Amit Shah: “…तेव्हा मला राग येतो”, गृहमंत्री अमित शहांचा संसदेत खुलासा

नवी दिल्ली | देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) नेहमी आक्रमक भूमिका घेताना नेहमी दिसतात. संसदेत देखील आक्रमक भाषण देखील दिली आहेत. विरोधकांना आपल्या भाषण शैलीत गार करण्याची कला अमित शहामध्ये आहे.

अशातच आज संसदेत अमित शहा यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांच्या स्वभावाबद्दल एक खुलासा केली आहे. झालं असं की, संसदेत फौजदारी प्रक्रिया विधेयकावर चर्चा सुरू होती.

त्यावेळी तृणमुल काँग्रेसचे खासदार सौगता राॅय यांनी विरोध दर्शवत सवाल केला. त्यावेळी, आपण अशा कोणत्याही मॅन्यूलचा मसुदा पाहिला नाही, असं ते म्हणाले. त्यावर अमित शहांनी तुम्ही सरकारमध्ये नसल्याने बघणार नाही, असं उत्तर दिलं.

तुम्ही सरकारमध्ये असता तर मसुदा नक्की बघितला असता, असं अमित शहा म्हणाले. अमित शहांंचं हे वक्तव्य काही जणांना खटकलं. त्यावेळी तृणमुल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी अमित शहांना टोकलं.

आपण जेव्हा सौगता राॅय यांच्याशी बोलता. त्यावेळी रागावत बोलता असं बंडोपाध्याय म्हणाले. त्यावर अमित शहांनी हसत उत्तर दिलं. नाही… नाही… मी कोणावर रागवत नाही, असं अमित शहा म्हणाले.

माझा आवाज मोठा आहे. त्यामुळे तो मॅन्यूफॅक्च्यूअल डिफेक्ट आहे, असं अमित शहा हसत म्हणाले. त्यावेळी मला राग येत नाही. मला फक्त काश्मीरचा प्रश्न येतो, तेव्हा राग येतो, असं अमित शहा संसदेत म्हणाले आहेत.

दरम्यान, तृणमुल नेत्यांच्या प्रश्नांवर अमित शहांनी संसदेत सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याचं पहायला मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या-

“राज ठाकरेंंना माझी हात जोडून विनंती आहे की…”

कोरोनाच्या चौथ्या लाटेबद्दल अदर पुनावाला यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेच्या मुस्लीम कार्यकर्त्यांचे राजीनामे

“गद्दारी ती गद्दारीच, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी…”, नारायण राणे कडाडले

पुढील 4 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा