…तर मुंबई महापालिका पाडू शकते नारायण राणेंचं घर; वाचा काय सांगतो नियम

मुंबई | पुर्वाश्रमीचे शिवसेना नेते आणि सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

अशातच आता नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाबत मुंबई महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्यानं राजकारण पेटलं आहे.

जुहू येथील अधिष या नारायण राणेंच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार महापालिकेकडे आली होती. त्यानंतर पालिकेचे अधिकारी पोलीस संरक्षणात राणेंच्या बगल्यावर गेले होते.

पण परिवारातील सदस्यांनी सोमवारी येण्याची विनंती केल्यानं आता पथक सोमवारी जाणार आहे. तपासणीत काही अनधिकृत बांधकाम आढळलं तर कारवाई होण्याची शक्यता आहे.

चटईक्षेत्र उल्लंघन, बेकायदा बांधकाम असा प्रकार आढळल्यास पालिका प्रशासन राणेंना नोटीस बजावून बांधकाम पाडण्याची विनंती करू शकते.

राणेंनी लवकर बांधकाम पाडले नाही तर पालिका आपला विशेषाधिकार वापरून बांधकामावर कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिका प्रशासनानं नोटीस पाठवल्यापासूनच वादाला सुरूवात झाली आहे.

दरम्यान, राणे कुटुंबीयांवर शिवसेना हेतूपुरेस्पर कारवाई करत असल्याची टीका भाजपनं केली आहे. शिवसेना आणि राणे कुटुंबामधील वादाला कोकणातील सत्तासंघर्षाची किनार लाभलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“आता कुठं पळणार? मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार”; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

Google वर कधीही ‘काॅल गर्ल’ सर्च करू नका, तुमच्यासोबतही घडू शकतो धक्कादायक प्रकार

फरहान-शिबानीच्या हळदीची एकच चर्चा, रिया चक्रवर्तीचा डान्स तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ

“किरीट सोमय्यांना वाॅचमनची नोकरी द्या, नाहीतर माळ्याची नोकरी द्या…”

विराटच्या RCBला मिळणार नवा कर्णधार; आता धोनीचा ‘हा’ भिडू सांभाळणार जबाबदारी