सोलापूर | गेल्या वर्षात चांगल्या पावसामुळे राज्यात मुबलक पाणीसाठा झालेला आहे. राज्यभरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली आहे. मात्र मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड होत असल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
सोलापूर जिल्हा एकेकाळी दुष्काळी जिल्हा होता. मात्र आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितलं की, 22 लाख ऊसाचा गाळप झाला आहे. इतक्या जास्त प्रमाणात लागवड होत राहिली तर एक दिवस आत्महत्या करावी लागेल, हा माझा शब्द आठवणीत ठेवा, असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी माझ्याकडे ब्राझीलचे शिष्टमंडळ आलं होतं. त्यांच्याकडे दुष्काळ पडलाय म्हणून बबनराव आज तुमच्या चेहऱ्यावर हसू आहे, असं गडकरी म्हणालेत.
ब्राझीलमध्ये साखर वाढली तर साखरेचा भाव 22 रूपये होईल. तुम्हाला राजकारण करायचे आहे. तुम्हाला ऊसाचे दर काही कमी करता येणार नाहीत, असा टोलाही नितीन गडकरींनी लगावला आहे.
नितीन गडकरींनी यावेळी ऊसापासून इथेनॉल निर्मिती करण्याचा पुन्हा एकदा म्हटलं आहे. ऊसाच्या सायपरपासून इथेनॉल निर्मिती करा, मला आनंद आहे की, इथे इथेनॉल निर्मिती होते. इथून पेट्रोल हद्दपार करा, असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र साखरेच्या उत्पादनात जगात तिसरा आहे. मात्र साखर घाट्यात जाणार असल्यामुळे हायड्रोजन निर्माण करायला सुरू करा, असं नितीन गडकरींनी सांगितलं.
नितीन गडकरींनी यावेळी अपुर्ण असलेली विकासकामे पुर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे. महाराष्ट्रात सर्वांत जास्त काम सोलापूरात झाली असावीत, असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे.
दरम्यान, भूसंपादनाची रक्कम वाढावी याकरिता महाराष्ट्रामध्ये काही जणांनी झाडे लावली आहेत. आम्ही असले धंदे काय करणार नाही. आमदार आणि खासदारांनी ज्या मागण्या त्या मागण्या मंजूर करण्याची घोषणा यावेळी नितीन गडकरींनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रशांत किशोर यांच्या ‘त्या’ प्रस्तावानंतर सोनिया गांधींनी उचललं मोठं पाऊल!
“…तरच राज्यातील मशिदींवर असलेले भोंगे हटवण्यात येतील”
‘…म्हणून आम्ही सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला’; फडणवीसांनी सांगितलं कारण
“मी खालच्या जातीची आहे म्हणत मला जेलमध्ये पाणी दिलं जात नाहीये”
‘राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर…’; संजय राऊतांचा हल्लाबोल