…तर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील; मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली  |  कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून देशातील पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून पेट्रोल-डिझेल दरामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना इंंधनदर परवडेनासे झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदीवर सडकूण टीका करत आहेत.

अनेक राज्यांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. तर आता पाठोपोठ डिझेलचा दर देखील शंभरी गाठण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. मात्र आता जनतेला यातून दिलासा मिळू शकणार असल्याचे संकेत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी दिले आहेत.

देशात 1 जूलै 2017 पासून जीएसटी लागू करण्यात आला आहे. परंतू सरकारने पेट्रोलियम उत्पादनावरील टॅक्स हा सरकारसाठी महसूलचा एक महत्वाचं साधन आहे. त्यामुळे पेट्रोलियम उत्पादनांवर जीएसटी लागू करण्यात आला नव्हता. मात्र आता पेट्रोलियम उत्पादनांवरही जीएसटी लावण्याचा विचार सरकार आता करत असल्याचं समजतं आहे.

पेट्रोलियम उत्पादनांवर जीएसटी लावल्यास संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखेच राहतील. त्याचबरोबर जीएसटीमध्ये कमी स्लॅबचा पर्याय निवडल्यास किंमत कमी होण्याची देखील शक्यता आहे.

5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के असे भारतात जीएसटीचे प्राथमिक दर आहेत. याधील जीएसटीचा सर्वाधिक दर जरी पेट्रोलियम उत्पादनांवर लागू केला तरी पेट्रोलचे दर कमी होऊन ते निम्म्यापर्यंत येण्याची शक्यता आहे.

सरकारी आकडेवारीनूसार यावर्षी 2,37,338 कोटी रुपये पेट्रोलियम क्षेत्रातून सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. त्यामधील 1,53,281 कोटी रुपये इतका वाटा केंद्र सरकारचा होता तर त्यातील 84,057 कोटी रुपये इतका वाटा राज्य सरकारचा होता.

2019-20मध्ये हेच अनुदान एकूण 5,55,370 कोटींचे होते. तर केंद्रीय अर्थसंकल्पानुसार 2021-22 या वर्षात पेट्रोलियम क्षेत्रातून एकूण 3.46 लाख कोटी जमा होऊ शकतात, असा अंदाज निर्मला सितारामण यांनी वर्तवला आहे.

दरम्यान, दिल्लीत 23 फेब्रुवारी रोजी एक लिटर पेट्रोलची किंमत 90.97 रुपये आणि डिझेलची किंमत 81.36 रुपये होते. म्हणजेच 2021 या वर्षाच्या सुरुवातीला 54 दिवसांत दिल्लीत एक लिटर पेट्रोल 7.22 रुपये आणि डिझेल 7.45 रुपयांनी महाग झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘बिग बाॅस’ फेम ‘ही’ अभिनेत्री करणार लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण?, सोशल मीडियावर रंगली चर्चा

मुख्यमंत्री बलात्काऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत, संजय राठोडला तर चपलेने झोडायला पाहिजे- चित्रा वाघ

‘या’ अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज पाहूण चाहते घायाळ, पाहा फोटो

‘मी मर्द आहे असं पुन्हा केव्हा म्हणू नका’; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टिका

मोठी बातमी! ‘या’ कारणाने महाविकास आघाडीत शिवसेनेची कोंडी