‘…तर सचिन तेंडुलकर, लक्ष्मण, गांगुली कधीच खेळू शकले नसते’; ‘या’ क्रिकेटरने केला खुलासा

नवी दिल्ली |  भारतीय लोकांना क्रिकेट हा खेळ खूप आवडतो. क्रिकेट बद्दल काहीही माहिती असली तरी सगळेजण ती जाणून घेण्यास प्रचंड उत्सुक असतात.

आपल्याला माहिती आहे की, माजी क्रिकेट संघातील सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या खेळीमुळे तर प्रसिद्ध आहेसच. परंतू तो त्याच्या परखड व्यक्तिमत्वामुळेही सर्वांमध्ये प्रसिद्ध आहे. वीरेंद्र हा नेमहमीच क्रिकेटबद्दलच आपलं मत व्यक्त करत असतो. तर कधी तो आपल्याला क्रिकेट विश्वातील महत्वाची माहीती देतो.

अशातच वीरेंद्र सेहवाघने एका गोष्टीचा खुलासा केला आहे. त्याने यावेळी क्रिकेट खेळाडूंच्या फिटनेसबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. त्याने सांगितलं की, कोणत्याही खेळडूला सामना खेळण्यासाठी ‘यो-यो’ टेस्ट पास होणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

यो-यो टेस्ट खेळाडूच्या फिटनेस संबंधित आहे. परंतू फिटनेसपेक्षा टॅलेंट जास्त गरजेचं आहे, असं सेहवागने म्हटलं आहे. सेहवाग क्रिकबज सोबत संवाद साधला. त्यावेळी वीरेंद्र सेहवाग बोलत होता. आधी ही यो-यो टेस्ट असती तर सचिन तेंडुलकर, लक्ष्मण आणि गांगुली कधीच पास झाले नसते, असा खुलासा केला आहे.

टीममध्ये खेळाडूंच्या निवडबाबत अशाचप्रकरे निकष असले तर सचिन, गांगुली आणि लक्ष्मण कधीच पास झाले नसते. मी स्वत: या तीनही दिग्गजांना बीप टेस्टमध्ये पास होताना नाही बघितलं. बीप टेस्टमध्ये 12.5 गुण गरजेचे होणे. सचिन, गांगुली आणि लक्ष्मण 10 किंवा 11 गुण आणायचे. परंतू या खेळाडूंचे स्किल चांगलंं होतं, असं वीरेंद्र सेहवाघ याने सांगितलं आहे.

त्याचप्रमाणे फिटनेसपेक्षा स्कील जास्त महत्वाचं आहे. जर तुमची टीम फिट आहे आणि तुम्ही मॅच हारत असाल, तर खेळाडूंमध्ये स्कीलची कमी असेल तर व्यर्थ आहे. तसेच जे चांगली फंलदाजी आणि गोलंदाजी करतात. त्यांना खेळवायला हवं. कराण असेच खेळाडू कठीण काळात चांगली कामगिरी करून दाखवतात, असं सेहवाग म्हणाला आहे.

याशिवाय अशाप्रकारचे खेळाडू फिल्डिंगसाठी देखील फिट असतात. त्याचप्रमाणे अशा खेळाडूंची हळूहळू फिटनेसही चांगली करता येऊ शकते असल्यातही सेहवागने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“आणखी 15 दिवस तरी राज्यात लॉकडाऊन लावला जाणार…

“आधी बुडणाऱ्या रोजगारांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक…

सर्वसामान्यांसाठी खुशखबर! आता पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त…

बॉबी देओलने 24 वर्षांपूर्वीच केली होती कोरोनाची भविष्यवाणी;…

‘माझे आजोबाच माझं लैं.गिक शो.षण करायचे’;…