नवी दिल्ली | रशिया युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. या युद्धामुळे अनेकांचे मोठं नुकसान झालं आहे. अद्यापही युद्ध सुरु आहे.
गेल्या 25 दिवसांपासून रशियाकडून युक्रेनवर बॉम्बहल्ले, हवाईहल्ले तसेच क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. या हल्ल्यांत युक्रेनमध्ये मोठी जीवीत तसेच वित्तहानी झालेली आहे.
रशियाचं सैन्य युक्रेन-नाटो सीमेजवळ आल्याने रशिया आणि नाटो सैन्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याची स्थिती नाजूक आहे.
आज सलग 25 व्या दिवशीही युद्ध सुरूच आहे. युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्यासोबत चर्चेची तयारी दर्शवली आहे. मात्र ही चर्चा अपयशी ठरल्यास तिसरं महायुद्ध होण्याची भीती झेलेनस्की यांनी व्यक्त केली.
रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आपण तयार आहोत, असं झेलेन्स्की यांनी ‘सीएनएन’ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं.
युद्ध थांबवण्यासाठी आमच्याकडे फक्त एक टक्के संधी असेल तरी ती संधी आम्ही गमावणार नाही, असेही झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले.
रशिया युक्रेन यांच्यातलं युद्ध थांबण्याचं नावच घेत नाहीये. चर्चेच्या फेऱ्याही निष्फळ ठरल्या आहेत. या दोन्ही देशांच्या युद्धाचा जगभरातल्या इतर अनेक देशांवर परिणाम होत आहे.
दरम्यान, रशियाने युक्रेनमधील मारियुपोल शहरावर जोरदार हल्ले सुरू केले आहेत. या शहरातील बहुतांशी निवासी इमारतीदेखील उद्धवस्त झाल्या असून शहर बेचिराख झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
लाईव्ह मॅच सुरू असताना गॅलरी ढासळली अन्…, पाहा धक्कादायक व्हिडीओ
“फक्त म्हणायला ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ घेतं पवार सरकार”
बायकोनं मटन बनवलं नाही म्हणून नवऱ्याने फिरवला फोन, पोलीस घरी आले अन् घडलं भलतच!
धक्कादायक! मॅच सुरू असताना अचानक कोसळली गॅलरी; 200 हून अधिक जखमी; पाहा व्हिडीओ
“धनंजय मुंडे आणि माझ्यावर एखादा चित्रपट निघाला तर…”