‘…तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढू’; शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

नागपूर | राज्यात  महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष टिकणार, असं सात्त्याने आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

आता येत्या काही महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार का?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

अशातच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला गेला. त्यावेळी शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नागपूर महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार का? हे आताच सांगता येणार नाही, पण एकत्र लढवली तर फायदाच होईल, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र आली तर योग्यच आहे, नाहीतर आम्ही एकट लढू, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

शरद पवारांच्या या स्वबळाच्या वक्तव्याने आता शिवसेना आणि काँग्रेसला थेट इशाराच मिळाल्याचं दिसतंय. त्यामुळे आता राष्ट्रवादी स्वबळाची तयारी करणार की काय?, असा सवाल देखील उपस्थित होताना दिसतंय.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची बाराखडी वाचायला सुरू केली होती. मात्र, दिल्ली दौऱ्यानंतर नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा उच्चारली नाही.

एसटीचा संप तुटेल एवढा ताणू नये, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं देखील आवाहन केलं आहे,

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. तसेच एसटीचं लगेचच विलगीकरण करणं शक्य नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, कोणतंही कारण नसताना अनिल देशमुखांना समोरं जावं लागलं. हा त्यांच्यावर केलेला अन्याय आहे, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘कामावर हजर व्हा अन्यथा…’; एसटी कर्मचाऱ्यांना 24 तासांचा अल्टीमेटम

आयसीसीमध्ये चालणार ‘दादा’गिरी! सौरव गांगुलीच्या खांद्यावर आली ‘ही’ मोठी जबाबदारी

 “सांगे कीर्ती बापाची, तो एक मुर्ख”; नाना पटोलेंवर खोचक टीका

 संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

इंधन दरवाढीचा परिणाम आता रिक्षावरही; केली ‘इतक्या’ रुपयांची वाढ