“…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार” – घटनातज्ज्ञ उल्हास बापट

मुंबई | सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट यांच्या वादावर खटला सुरु आहे. यात शिवसेना कोणाची? 16 अपात्र आमदारांवर कारवाई आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाचे आदी मुद्दे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

पाच सदस्यीय घटनापिठापुढे सुरु असलेल्या या याचिकांवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अशातच या संघर्षावर आता घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी भाष्य केले आणि शक्यता वर्तविल्या आहेत.

शिवसेनेने बंड झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मिळून एकूण 16 आमदारांवर पक्षाचा व्हिप मोडल्याप्रकरणी आणि पक्षाची शिस्त मोडल्याप्रकरणी अपात्रतेची कारवाई केली होती.

त्यामुळे पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार जर पाहायचे झाले, तर या 16 आमदांचे पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत निलंबन झाले, तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल, असे उल्हास बापट यांनी म्हंटले आहे.

पहिले 16 आमदार जे पक्षाबाहेर गेले, ते दोन तृतीअंश आमदार नव्हते, त्यामुळे त्यांचे कायद्याने निलंबन व्हायला पाहिजे, असे माझे व्यक्तीगत मत असल्याचे बापट म्हणाले.

तसेच 2003 साली पक्षांतर बंदी कायद्यात झालेल्या सुधारणेनुसार, पक्षांतर बंदी कायद्यात जर निलंबन झाले, तर त्या आमदाराला मंत्रीपदावर राहता येत नाही, असे उल्हास बापट म्हणाले.

पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत निलंबन केले, तर 16 आमदारांना मंत्री राहता येणार नाही. त्यामुळे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील मंत्रीपद सोडावे लागणार आहे. पर्यायी महाराष्ट्राचे सरकार पडू शकते, असे उल्हास बापट यांचे मत आहे.

महत्वाच्या बातम्या –

संजय राऊत यांची आज सुनावणी पार पडली; महत्वाची माहिती समोर

‘राजस्थानातील 90 आमदारांच्या बंडावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मोठा निर्णय’

“… म्हणून त्यांच्यावर पक्षांतरविरोधी कारवाईचा आरोप नक्की करावा”; सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद

“गुजरातचा सिंह महाराष्ट्रात येणार आणि महाराष्ट्राचा वाघ गुजरातला जाणार” – सुंधीर मुनगंटीवार

“उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे”; भाजप नेत्याची मोठी टीका