Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

“देशातल्या अनेक मुस्लीम नागरिकांनादेखील भोंग्याचा त्रास होतो”

raj 55 e1648913758569
Photo courtesy - facebook /MNS Adhikrut

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंनी 4 मे पर्यंतचा अल्टीमेटम राज्य सरकारला दिला होता. ईदच्या दिवशी भोंग्याबाबत भूमिका जाहीर करेन, असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. ट्विट करत राज ठाकरेंनी सविस्तर भूमिका मांडलेली आहे.

मशिदीवरील भोंगे 4 मे पर्यंत उतरवा, असे आम्ही सरकारला अगोदरच सांगितले होते. या देशातल्या राज्यसरकारामधले प्रत्येकजण सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देत आहे.

धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध, रूग्ण, अशक्त व्यक्ती, लहान मुले आणि विद्यार्थी यांना भोंग्याच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.

प्रत्येक धर्मियांच्या सणाला तेवढ्या दिवसांपुर्ती ध्वनीक्षेप लावण्याची परवानगी भेटेल. मात्र, 365 दिवस परवानगी मिळणार नाही.ध्वनिक्षेपाबाबतची परवानगी रोज घ्यावी लागेल.

लोकवस्ती असलेल्या भागामध्ये कमीतकमी 10 डेसिबल आणि जास्तीत जास्त 45 ते 55 डेसिबल आवाजात ध्वनिक्षेप लावता येणार आहे.

सर्व भोंगे हे अनधिकृत आहेत. भोंगेच कशाला अनेक मशिदी अनधिकृत आहेत. सरकार अनधिकृत मशिदीवर अधिकृत परवानग्या का आणि कशा देते?, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

अनधिकृत मशिदी, अनधिकृत भोंगे, रस्त्यांवर नमाजासाठी बसणे आणि वाहतूक कोंडी करणे हे कोणत्या धर्मात बसते?,हा सामाजिक विषय आहे हे आधी समजून घ्या, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान,  आपल्या देशामध्ये असे अनेक मुस्लिम नागरिक आहेत की, ज्यांना भोंग्याचा त्रास होतो. मात्र, कर्मठ धर्मगुरूंपुढे कट्टर धर्मवाद्यांपुढे त्यांना बोलता येत नाही. देशभरातल्या तमाम हिंदू बांधवांनी भोंग्याविरोधात काम सुरू करावे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

पाहा ट्विट-  

महत्त्वाच्या बातम्या- 

“कोणाच्याही आदेशाची वाट न पाहता योग्य ती पावले उचला”

राजकीय गोंधळ!… अन् छगन भुजबळांना आली RRR चित्रपटाची आठवण

“…तर आम्ही त्यांना सोडणार नाही”; भीम आर्मीचा राज ठाकरेंना गंभीर इशारा

 सर्वांत मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

राज्यातील सर्व पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!