Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘का उगाच वणवण भटकताय, चर्चा होऊ शकते’; बंडखोर आमदारांसाठी संजय राऊतांचं ट्विट

sanjay raut 2 e1637068345791
Photo Courtesy - Twitter/@LalanKumarINC

मुंबई | एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांच्या बंडाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आमदारांना भावनिक साद घातली होती. मात्र, त्यानंतरही आमदार मोठ्या संख्येने शिंदे गटात जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही बंडखोर आमदारांना मुंबईत परत येण्याचं आवाहन केलं होतं. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही समोर येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करा, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं.

संजय राऊतांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली. यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा चर्चेसाठी आवाहन केलं आहे.

चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते, अशी साद संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना घातली आहे.

घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वणवण भटकताय, असा सवाल देखील संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ, असं देखील संजय राऊत ट्विट करत म्हणाले आहेत. संजय राऊतांच्या या ट्विटला आता शिंदे गटातून काय प्रत्युत्तर येणार, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘एकदा तरी चर्चा करायला हवी होती’, राऊतांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची नाराजी?

‘आता माघारी जाण्याचा प्रश्नच नाही’, राऊतांच्या आवाहनाला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

राज्यातील सरकारबाबत नाशिकच्या अनिकेत शास्त्री यांचा सर्वात मोठा दावा, म्हणाले…

‘शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार फक्त…’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

सूरतमधून निसटून आलेल्या कैलास पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!