शरद पवारांसारखं काळानुसार अपडेट रहायला हवं- अजित पवार

पुणे | शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल घडत असल्याने अध्यापकांनी नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे असून  अध्यापकांना त्याकरिता आवश्यक दृष्टीकोन देण्यास महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था उपयुक्त ठरेल, असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी पुण्यात महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या उद्घाटनावेळी व्यक्त केलं. यावेळी बोलताना अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(NCP President Sharad Pawar) यांचं उदाहरण दिलं आहे.

विद्यार्थ्यांनी जी पदवी घेतली त्यावरचं अवलंबून राहू नये. शरद पवारांना मी खूप जवळून पाहतो. ते आजही तरूण पिढीसोबत चालण्याचे प्रयत्न करतात. तसेच शरद पवारांसारख अपडेट राहायला हवं, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. आजचा विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जो़डला गेला आहे. तो अभियांत्रिकी वैद्यकीय चित्रपट, नाटक, कला, संस्कृती, नवे शोध आदी क्षेत्रांबाबत अधिक जागृक असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.

शिक्षक आणि संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांच्या पुढे राहण्याकरिता नवा दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. अध्यापक विकास संस्थेच्या माध्यमातून नव्या युगातील आधुनिक ज्ञान आणि प्राध्यापकांच्या नेतृत्व गुणांचा विकास करणे शक्य होईल आणि चांगले शिक्षक घडविण्यासाठी ही संस्था उपयुक्त ठरेल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

देशाला गुरूशिष्य परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. हा वारसा समृद्ध करण्याचं काम महाराष्ट्राने केलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या ध्येयनिष्ठ गुरूजनांनी शिक्षणाची गंगा शेतकरी कष्टकरी बहुजन समाजाच्या घरापर्यंत नेण्याचे काम केले, असं अजित पवार म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले (RanjitSingh Disley) गुरूजींचं उदाहरण दिलं आहे. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्यासारख्या अनेक शिक्षकांचे कार्य मौलिक असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

काळ बदलला आहे. विद्यार्थी बदलले आहेत. त्यामुळे शिक्षकांनीही बदलायला हवं. आजचे विद्यार्थी शिक्षकांपेक्षा अधिक हुशार झाले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काय माहिती मिळते याबाबत आजचे विद्यार्थी जागृक आहेत.

यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये शहाण्यांना अधिक शहाण करण्यासाठीचं अध्यापक विकास संस्था काम करणार असल्याचं म्हटलं आहे. नवनवीन गोष्टी देण्याकरिता राज्य सरकारने पुढे राहिले पाहिजे. सारथीच्या (Sarathi) इमारतीचे काम लवकरच सुरू करायचे आहे. मुख्यमंत्र्यांची तारीख मिळाल्यावर भूमीपुजन केलं जाईल, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. सर्वांनी नियम पाळावेत. ओमिक्रॉनचा धोका पाहुन त्याचं तंतोतंत पालन करावं, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“भाजपनं ओबीसींविरुद्ध केलेल्या पापामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर…”

“अजित पवार यांनी दरडावून नाही तर समजावून सांगावं”

मला तर वाटतं मरावं आणि त्या राणी बागेतल्या…- सुधीर मुनगंटीवार

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती! 

“…त्यात आमचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही फासावर लटकवून टाका”