मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना यांच्यातील वाद काही नवीन नाही. यांच्यात वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणावरून खटके उडताना महाराष्ट्राने पाहिले आहेत.
अशातच भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रंगला असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वादात उडी घेतली.
नारायण राणे यांनी भाजपवर करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.
अशातच आता राणे आणि शिवसेना वाद पुन्हा पेटला आहे. नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाबत मुंबई महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्यानं कडवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.
जुहू येथील अधिष या नारायण राणेंच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार महापालिकेकडे आली होती. पासणीत काही अनधिकृत बांधकाम आढळलं तर कारवाई होण्याची शक्यता आहे.
अशातच आता नितेश राणे यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्याने हे सर्व पाहत असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
राणे कुटुंबीय असो, किरीट सोमय्या असो किंवा देवेंद्र फडणवीस, जे जे या सरकार विरोधात बोलतात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
त्यांना ज्या ज्या प्रकारे लढायचंय आहे ते येऊ दे आमच्या अंगावर आम्ही घाबरत नाही, असं रोकठोक वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय.
मैदानात हरायचं आणि शेंबड्या मुलासारखं लढायचं याला काही अर्थ नाही, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी यावेळी ठाकरे सरकारवर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Gold Silver Rate: सोनं पुन्हा 50 हजाराच्या पार, चांदीचे दर देखील गगनाला भिडले
…तर मुंबई महापालिका पाडू शकते नारायण राणेंचं घर; वाचा काय सांगतो नियम
“आता कुठं पळणार? मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार”; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट
Google वर कधीही ‘काॅल गर्ल’ सर्च करू नका, तुमच्यासोबतही घडू शकतो धक्कादायक प्रकार
फरहान-शिबानीच्या हळदीची एकच चर्चा, रिया चक्रवर्तीचा डान्स तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ