वॉशिंग्टन : काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थीचा मुद्दा चर्चेत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:च स्पष्ट केलं असल्याचं भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या गेल्या महिन्यातील दौऱ्यामध्ये ट्रम्प यांनी मध्यस्थीचा प्रस्ताव मांडला होता. दुसऱ्या आठवड्यामध्येही त्यांनी पुन्हा इच्छा व्यक्त केली होती. भारताने त्याला ठाम शब्दांमध्ये नकार दिला आहे.
भारताने मध्यस्थी करण्यास नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन शृंगला यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमेेरिका मध्यस्थी करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
काश्मीर मुद्द्यावर भारत व पाकिस्तान यांनी परस्पर सामंजस्यानेच तोडगा काढावा, अशी अमेरिकेची आतापर्यंतची भूमिका आहे. त्यात तटस्थतेचा मुद्दाच नाही. दोन्ही देशांना मान्य असेल, तरच मध्यस्थी करू असे ट्रम्प यांनीही म्हटलं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांनी केलाला दावा फेटाळून लावला आहे. मोदींचं ट्रम्प यांच्याशी मध्यस्थीबाबत कोणतंही बोलणं झालं नसून केवळ द्वीपक्षीय संबंधांवर चर्चा झाल्याचं परराष्ट्र विभागानं स्पष्ट केलं आहे.
काश्मीर प्रश्नावर कोणत्याही देशाची मध्यस्थी स्वीकारणार नसल्याच्या भूमिकेवर भारत आजही ठाम असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“खरा तो एकची धर्म…” म्हणत उर्मिलाची पूरग्रस्तांना मदत
-राजस्थानमध्ये पोषण आहारातून 36 मुलांना विषबाधा
-पूरग्रस्त भागात शरद पवार स्वातंत्र्यदिन साजरा करणार
-“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा आहेत की फडणवीस???”
-टी-20 विश्वचषकात दिव्यांगांनी मिळवून दिलं भारताला विश्वविजेतेपद