“असा तुरुंग अजून बनला नाही जो मला 2 वर्षे तुरुंगात ठेवू शकतो”

मुंबई | शिवसेना भवनामध्ये शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजप खुले आव्हान दिलं आहे.

कितीही आमच्या पाठीवर वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहता की, शिवसेना असेल ठाकरे परिवार असतील, अगदी पवार साहेबांच्या कुटूंबापासून सगळ्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा हल्ले करत आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून महाराष्ट्र सरकार त्यांना पाडायचं आहे. सरकार घालवण्यासाठी आम्हाला मदत करा अन्यथा तुम्हाला केंद्रीय तपास यंत्रणा टाईट करतील, असं सांगत संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केलं आहे.

हा काय प्रकार आहे?, केंद्रीय तपास यंत्रणांचा, ईडीचा, सीबीआयचा गैरवापर करून आम्हाला त्रास देता. तुम्ही काहीही करा हे सरकार पाडणार नाही. तसेच संजय राऊत यांनी तुम्हाला त्रास द्यायचा असेल तर मला द्या, असंही म्हटलं आहेत.  असा तुरुंग अजून बनला नाही जो मला 2 वर्षे तुरुंगात ठेवू शकतो, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

उद्धवजी यांनी मला सांगितल आहे की, सत्य जनतेसमोर येऊ द्या. हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे. बाहेरची लोक आमच्या मुलींकडे पाहणार, भाजपची लोक टाळ्या वाजवणार, हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे, असं संजय राऊत यांनी ठणकावलं आहे.

दरम्यान, शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष कमालीचा वाढला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून शिवसेनेच्या नेत्यांना बदनाम करण्यात येत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी भाजपला खुलं आव्हान दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”

“सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर…”; संजय राऊत यांचा भाजपला मोठा इशारा

“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”

‘शेती इकायची नसती वो, राखायची असती’; प्रविण तरडेंनी शेअर केला वडिलांसोबतचा व्हिडीओ

निवडणुकीआधी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा; तब्बल 46 वर्षांनंतर ‘हात’ सोडला