Top news आरोग्य कोरोना

चीनकडे कोरोनाचा फैलाव रोखण्याची क्षमताच नव्हती- डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन | कोरोना विषाणूच्या फैलावावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील आरोपांच्या फैरी सुरूच ठेवल्या आहेत. कोरोनाच्या फैलावाचा सामना करताना चीनकडून भयानक चूक झाली आहे किंवा त्यांची क्षमताच नव्हती, अशी टीका ट्रम्प यांनी केली आहे.

कोरोनाचा फैलाव सुरुवातीलाच थांबवणं शक्य होतं आणि ती गोष्ट सोपीही होती. मात्र चीनला ते शक्य झालं नाही. तेथे कोणीतरी मूर्ख होता आणि त्याने त्याचं काम योग्य पद्धतीने केलं नाही, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

लष्करातील सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आपणही दररोज कोरोनाची चाचणी करून घेणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान, कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत दोन लाख 64 हजार जणांचा मृत्यू झाला असून, त्यात अमेरिकेतील 76 हजार नागरिकांचा समावेश असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोणत्याही लसीशिवाय कोरोना निघून जाणार; डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

-“उपलब्ध झालेले रोजगार हीच संधी आहे… मराठी तरूणांनो नंतर गळे काढून रडू नका”

-भाजपने विधानपरिषदेची जागा न दिल्याने रामदास आठवले नाराज!

-रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले कोरोना आणि लॉकडाऊनचे बळी- संजय राऊत

-आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड, ‘या’ छुप्या पद्धतीनं काढून टाकलं जातंय