Top news कोरोना देश

घरात जागा नाही म्हणून ‘तो’ चक्क 11 दिवस झाडावर झाला क्वारंटाईन

नवी दिल्ली| मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तर मृत्युचे तांडवच चालवले आहे.

देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढतेय, तशी मृतांची संख्याही मन हेलवणारी आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे. देशातील प्रत्येक राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. अशा संकट काळात अनेक लोक पुढे येत सढळ हातानं मदत करत आहेत.

एखाद्याला कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याला 14 दिवस क्वारंटाईन रहावं लागतं. मात्र अनेकांना लहान घर असल्यानं क्वारंटाईन राहण्याची समस्या उद्भवते. अशातच एका तरुणाला क्वारंटाईन राहण्याची समस्या होत असताना त्यानं चक्क स्वतःला झाडावर क्वारंटाईन केल्याची घटना समोर येत आहे.

तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यातील कोठानंदीकोंडा या गावातील ही घटना असून एका तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. क्वारंटाईन होण्यासाठी जागा नसल्यानं त्यानं राशेजारील झाडावरच 11 दिवस काढले.

या तरुणाचं नाव शिवा असून तो 18 वर्षांचा आहे. याविषयी बोलताना  शिवा म्हणाला की, आमच्या गावात क्वारंटाईन होण्याची व्यवस्था नाही. तसेच घरात चार सदस्य आहेत. त्यांना करोनाची बाधा होऊ नये यामुळे झाडावर क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. या कालावधीत कोणीही मदतीला आलं नाही. झाडावर राहत असताना कुटुंबीयांकडून एका बादलीला दोरी बांधून अन्न पुरविले जात होते.

दरम्यान, देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा तुटवडा सध्या भासतोय. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

लग्नातील वऱ्हाड्यांची तुफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

तलावावर पाणी प्यायला आलेल्यावर मगरीने केला हल्ला अन्…,…

चार अंडी चोरणं पोलीस हवालदाराला पडलं महागात, पाहा व्हायरल…

मोबाईल पाहणं तरूणाच्या आलं अंगलट, पाहा व्हायरल व्हिडीओ

फ्रिज उघडताच चक्क मांजर शिरलं फ्रिजमध्ये अन्…, पाहा…