पुणे महाराष्ट्र

आगामी काळात कृषी विभागासाठी लॉकडाउन नसणार आहे- दादा भुसे

पुणे | येत्या काळात पुढील लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यास, कृषी विभागासाठी लॉकडाउन नसणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

कोरोना विषाणुचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. शेतकरी पुन्हा उभा राहण्याच्या दृष्टीने विशेष उपाय योजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रासायनिक खते उपलब्ध करून दिली जात असल्याचं दादा भुसेंनी सांगितलं आहे.

50 हजार मेट्रिक टन बफर स्टॉक तयार करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्णय देखील घेतला आहे. तर काही ठिकाणी शेतकर्‍यांना कर्ज वाटप देखील झाले असल्याचं दादा भुसेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, आगामी काळ लक्षात घेता कापूस, कांदा, मका यासह इतर माल खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही ते म्हणाले. याचबरोबर शेतमाल वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी सहकार्य करण्याचं आवाहनही दादा भुसेंनी यावेळी केलंय.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारानं दाखवला मनाचा मोठेपणा; राहता बंगला दिला क्वारंटाईनसाठी

-अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण : अखेर सत्यशील शेरकर यांच्यावर गुन्हा दाखल

-छोटी राज्यपण तुमच्यासारखी जीएसटीसाठी रडत नाहीत; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

-सरकार भूमिका घेईल असं वाटत नाही, आता नातेवाईक मित्रमंडळींना भेटायला सुरू करा- आंबेडकर

-लॉकडाउन वाढवण्याच्या निर्णयाआधीच बच्चू कडूंनी अकोल्यात संचारबंदी केली जाहीर