“…म्हणून मराठवाडा आणि विदर्भ कायम दुष्काळी राहिला”

मुंबई : वीज निर्मिती झालेलं पाणी दुष्काळी भागात पाणी घेऊन जाणं महत्वाचं होतं. पण आजपर्यंतच्या  तसं झालं नाही. त्यामुळे  मराठवाडा आणि विदर्भ कायम दुष्काळी राहिला. आता आमची राज्यात सत्ता आल्यास धरण प्रशासनासोबत चर्चा करू आणि दुष्काळी भागात पाणी घेऊन जाऊ, असं आश्वासन वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे.

अनेक वर्ष दुष्काळी भागात पाणी पोहचवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न झाले नाहीत. त्यांमुळे या भागातली जनता  पाण्यापासून वंचित राहिली, असं आंबेडकर यांनी म्हटंल आहे. 

आमची सत्ता आल्यास असं होणार नाही. आम्ही पाणी दुष्काळी भागात घेऊन जाणार आहोत, असंही आंबेडकर म्हणाले.

काहीजण धर्माच्या नावावर तर काही जण धर्मनिरपेक्षतेच्या नावावर निवडणूक लढवत आहेत, असंही आंबेडकरांनी म्हटलं आहे.

समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत प्रश्नावर निवडणूक लढवली पाहिजे पण तसं होताना दिसत नाही. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

महत्वाच्या बातम्या-