…म्हणून महाविकास आघाडीच्या आमदाराला भर विधानसभेत रडू कोसळलं!

मुंबई | पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील विषयावर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी लक्षवेधी लावली होती. मात्र ती लागत नसल्यानं ते नाराज झाले. यावेळी बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

जर पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचा यांनी विषय घेतला नाही. तर 2011 साली जे प्रकरण झालं होतं. याची पुन्हा पुनरावृत्ती होईल. कारण त्यावेळी जे आंदोलन झालं होतं ते याच विषयासाठी झालं होतं, असं ते म्हणाले.

अजित पवार यांची भेट घेतली त्यांनी मीटिंग लावण्याचं आश्वासनं दिलं आहे. विधानसभेत देखील मला मीटिंग लावण्याचं आश्वासन मिळालं आहे.  त्यांना हा विषय मार्गी लावावाच लागेल, अन्यथा लढा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेळके यांनी दिला.

दरम्यान, आज विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी मोठी घोषणा केलीय. आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घर मिळावं (Home In Mumbai) अशी मागणी बुधवारी विधानसभेत शिवसेना आमदारांकडून करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आज मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

सरकारच्या या निर्णयावर देखील शेळकेंनी भाष्य केलं आहे. आमदारांना घरं देण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे, असं सुनील शेळके म्हणाले.

अनेक आमदार असे आहेत जे लोकवर्गणीतून आमदार आहेत. त्यांची परिस्थीत हालाखीची आहे. त्यांना घर मिळणे गरजेचं आहे, असं सुनील शेळके म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

सावधान! Omicron BA.2 व्हेरिअंटची दोन लक्षणं आली समोर, दिसताच डॉक्टरांकडे जा 

‘बायकोने ऑफिसमध्ये फोन करून चौकशी केली तर….’; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय 

“देवेंद्र फडणवीस झोपेतही बडबडतात, अन् बेडवरून खाली पडतात” 

 Russia-Ukraine War | युद्ध आणखी भडकणार?, ‘या’ देशाची युक्रेनला मोठी मदत

 “कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”