केतकी चितळेवर शेजाऱ्यांचे अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…

पुणे | अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. केतकी चितळेच्या पोस्टनंतर अनेक स्तरातून तिच्यावर टीका करण्यात आली आहे. अनुसुचित जातीजमातीच्या व्यक्तीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे रबाळे पोलिस ठाण्यात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातच आता केतकीच्या शेजाऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत.

केतकीने अनेकवेळा फु़ड डिलिव्हरी ऑर्डर केल्यानंतर अनेकवेळा वाद झाले आहेत. फुड डिलिव्हरी करण्यास येणाऱ्या मुलांसोबत केतकी विनाकारण वाद घालत असते, असं केतकीच्या शेजाऱ्यांनी सांगितलं आहे.

केतकी बिल्डिंगमधील शेजाऱ्यांसोबत कोणताच संवाद साधत नव्हती. सोसायटीमधील टीमने घेतलेले निर्णय केतकीला  मान्य नसतात, अशी तक्रार तिच्या शेजाऱ्यांनी केली आहे.

स्वीगी आणि झॉमेटोच्या कर्मचाऱ्यांसोबत अनेकवेळा वाईट पद्धतीने वागली, सोसायटीमधील निर्णयांनी केतकीने विनाकारण विरोध दर्शविला, असंही शेजाऱ्यांनी सांगितलं आहे.

केतकी चितळेच्या विरोधात राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. काही लोकांनी केतकी चितळेचे समर्थन केलं आहे. त्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी धारेवर धरलं आहे.

पुरोगामी महाराष्ट्राच्या सगळ्या महामानवांना शिव्या द्यायच्या आणि काही लोकांनी उठायचं आणि म्हणायचं निरागस आहे सोडून द्या, असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.

केतकी चितळे ही 34 वर्षांची आहे 29 वर्षाची नाही. आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर अपलोड केल्यामुळे अटक केलेली नाही ही एक समंजसपणाची कृती म्हणावी लागेल, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

केतकी चितळेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर , माता रमाई आणि महात्मा फुले यांच्याबद्दल अत्यंत अश्लील भाषेत निषेधार्ह पोस्ट केल्या होत्या, अशी आठवणही जितेंद्र आव्हाडांनी सांगितली.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘गांXX दम असेल तर मला उचलून दाखवा’; प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली

जाहीरातदार बीसीसीआयवर भडकले, जाणून घ्या काय आहे प्रकरण

 नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ! दाऊद प्रकरणात न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

 आयपीएलच्या पुढील हंगामात चैन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी पुन्हा धोनीच

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…