दररोज एक कप ‘ग्रीन टी’ पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच कामाच्या वाढत्या तणावामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टीचे सेवन वाढलं आहे. ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. अनेकांनी दुधाच्या चहाऐवजी ‘ग्रीन टी’ला पसंती दिली आहे. आज बाजारामध्ये अनेक नामांकित ब्रँडचे ग्रीन टी उपलब्ध आहेत. अनेक लोकांनी या ग्रीन टी चा समावेश आपल्या दैनंदिन आहारामध्ये केलेला आहे. ग्रीन टीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

ग्रीन टीचे आरोग्यदायी फायदे – 

1. ग्रीन टी मधील घटक शरीरातील मेटाबॉलिज्म घटकाला वाढवतात. त्यामुळे शरीरातील वजन कमी होते. पण वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी सोबतच नियमित व्यायामही गरजेचा असतो. भरपूर कॅलरीज-युक्त असा आहार घेतल्यानंतर ग्रीन टी पिण्याचा सल्ला तज्ञ देतात.

2. ग्रीन टी च्या सेवनामुळे रक्तामधील साखर कमी करता येते. त्यामुळे मधुमेहांच्या रुग्णासाठी हि एक वरदान सिद्ध होते. हे इन्सुलिन ला नियंत्रित करतो त्यामुळे मधुमेहात त्रास कमी होतो.

3. हृदय रोग असणाऱ्यांसाठी ग्रीन टीचे सेवन फायदेशीर ठरते. ग्रीन टी शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करताना चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. जर तुम्ही तेलकट जेवण जेवता तर नियमितपणे ग्रीन टीचे सेवन करा.

4. ग्रीन टी ची पूड आणि साखर हे मिश्रण एक उत्तम फेस स्क्रब म्हणून वापरता येते. ग्री टी उत्तम टोनर आहे. त्वचेचा पोत सुधारण्यासाठी याचा वापर करता येतो. जर डोळ्यांच्या खाली काही कारणाने सूज आली असले, तर ग्रीन टीच्या ओल्या टी बॅग्स डोळ्यांवर ठेवल्याने सूज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ग्रीन टी पिण्यासाठी वापरलेल्या टी बॅग्स चा पुन्हा वापर करता येतो.

5. ग्रीन टी मुळे भोजन नलीकेच्या कर्करोगाची समस्या दूर होते. यासोबतच आणखी काही हानिकारक कर्करोगांमध्ये डॉक्टर ग्रीन टी चे सेवन करण्याचे सुचवतात याचे नियमित सेवन केल्यास कर्करोग निर्माण करणाऱ्या कोशिकांना नष्ट करता येते.

6. गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी शरीराला अपायकारक ठरु शकते. यासाठी अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन करु नये.

7. ग्रीन टी मध्ये एपीगॅलोकॅटेचिन गॅलेट, म्हणजेच EGCG हे तत्व असते. हे तत्व वजन वाढण्याला अटकाव करते, व वाढलेले वजन घटविण्यास मदत करते. ग्रीन टी च्या एका कपमध्ये केवळ दोन कॅलरीज असतात.

8. ग्रीन टी ही तुमच्या त्वचेसाठीही उत्तम मानली जाते. मात्र काही जण दर दोन तासाला ग्रीन टी पितात. ज्यामुळे त्यांच्या शरीरावर हानी होऊ शकते. आपल्या शरीरात मेटाबॉलिज्म नावाचे एक घटक असतो. जो आपण काहीही खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर त्याचे रुपांतर ताकदीत करण्यासाठी शरीराला मदत करतो.

महत्वाच्या बातम्या –

पेट्रोल-डिझेलच्या दरात लवकरंच होणार घट? अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या…

“अनुराग आणि तापसी हे फक्त टॅक्स चोर नाहीत तर दहश.तवादी देखील आहेत” – कंगणा राणावत

राखीने शेअर केला बाथरुममधील ‘तो’ व्हिडिओ, पाहाल तर तुम्ही देखील हसून लोटपोट व्हाल

…म्हणून उद्धव ठाकरेंनी अद्याप कोरोनाची लस घेतली नाही; अखेर कारण आलं समोर

कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…; अमृता फडणविसांचं आणखी एक नवं गाणं