रोज वेलची खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

वेलची हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ. पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी चिमुटभर वेलचिचा वापर केला जातो. वेलचीचा उपयोग माऊथ फ्रेशनर म्हणून केला जातो. वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. लाल रक्त पेशी निर्मितीत एक महत्वाची भूमिका वेलची बजावते. वेलची खाण्याचे अनेक फायदे आहेत.

वेलची खाण्याचे फायदे –  

1. वेलची खाल्ल्याने सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. तुम्हाला जर कफ झाला असेल तर पाण्यात वेलची उकळून त्याचं सेवन करावं आराम मिळतो.

2. वेलची पावडर आणि दुधामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्यानं हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. हाडांसाठी उपयुक्त असलेल्या पोषक घटकांचा यामध्ये भरपूर प्रमाणात समावेश आहे. यामुळे दुध आणि वेलची पूड एकत्र करून प्यायल्यास शरीराला अधिक प्रमाणात कॅल्शिअमचा पुरवठा होतो.

3. वेलचीच्या बिया कुटून त्यात केळीच्या पानांचा रस व आवळ्याचा रस टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्याने लघवी मोकळी होते तसेच मूत्रासंबंधी जळजळ इ. तक्रारी दूर होतात. वेलची कुटून दुधासोबत घेतल्याने लघवीची जळजळ थांबते. यामुळे मूतखड्याच्या विकारातही लाभ होतो.

4. वेलची खाल्याने चांगली भूक लागते. वेलची चावून खाल्ली तर अॅसिडीटी दूर होते शिवाय होणारी जळजळ थांबते.

5. वेलचीनं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. वेलचीत सिस्टोलिक आणि डायस्टोलिक कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे रक्तदाब व्यवस्थित राहतो.

6. चवीसाठी मसाले जेवढे आवश्यक असतात तेवढेच ते आरोग्यदायीही आहेत. मसाल्यांमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे वेलची आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असणारी ही बहुगुणी वेलची रोज नक्की खायला हवी. त्यामुळे तुम्ही रोज निरोगी आणि फ्रेश राहाल.

7. वेलची खाल्ल्याने तुमच्या तोंडाचा दुर्गंध देखील दूर होतो. वेलची एक प्रकारे माऊथ फ्रेशनर प्रमाणे कार्य करते. जर आपल्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर आपण नेहमीच तोंडात एखादी वेलची ठेवू शकता.

8. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. पचनासाठी वेलची मदत करते. पोट फुगलं किंवा जळजळ होत असल्यास वेलची यातून तुमची सुटका करते.

महत्वाच्या बातम्या – 

जाणून घ्या! पुण्यात आज ‘इतके’ रुग्ण कोरोनाबाधित

शेवटच्या चार षटकांसाठी कर्णधार झाला अन् त्यानं गेलेला सामनाच…

जब्याच्या शालूनं लावली सोशल मीडियावर आग; ‘या’ गाण्यावरील अदा…

“…म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आरोग्यमंत्री…

नागपूरात पोलिसांनी हटकल्यानं महिलेचा भररस्त्यात राडा,…