ओमिक्रॉनमधून नीट झाल्यानंतर दिसतात ‘ही’ लक्षणं, अजिबात दुर्लक्ष करू नका

मुंबई | मागील काही दिवसांपासून कोरोना (Corona) आणि ओमिक्राॅन (Omicron) रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता ओमिक्राॅन व्हेरियंट पुन्हा अडचणी वाढवणार की काय ?, अशी चिंता सतावत आहे.

ओमिक्रॉन डेल्टा पेक्षा कमी प्राणघातक आहे असं म्हटलं जातं परंतु त्याची संसर्ग क्षमता अनेक पटींनी जास्त आहे. याशिवाय, ओमिक्रॉनमधून बरे झाल्यानंतरही व्यक्तीमधील त्याची काही लक्षणं तुम्हाला त्रास देऊ शकतात.

अभ्यासानुसार, ओमिक्रॉन प्रकारांच्या आठ नवीन लक्षणांमध्ये पाठदुखीचा समावेश आहे. ज्यावेळी हा नवीन प्रकार दक्षिण आफ्रिकेत आढळला होता. त्यावेळी हे लक्षण दिसत नव्हतं आता हे लक्षण प्रकर्षाने दिसून येत आहे.

ओमिक्रॉनचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही काही लक्षणं सतत जाणवत आहेत. कोविडची लक्षणे सौम्य असली तरी ती दीर्घकाळ टिकून राहतात.

Omicron प्रकारात तुम्हाला सौम्य ताप, घसा खवखवणे, शरीरात तीव्र वेदना, रात्री घाम येणे, नाक वाहणे, शिंका येणे, उलट्या होणे आणि भूक न लागणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.

ओमिक्रॉन सामान्य सर्दी-खोकल्यासारखे नाही, ते यापेक्षा खूप प्रभावी आहे, अशं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं होतं.

दरम्यान, Omicron त्वचेवर 21 तासांपेक्षा जास्त आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावर 8 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकू शकतो, अशी महत्त्वाची या अभ्यासातून माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Budget 2022: बजेट म्हणजे नक्की काय असतं? तुम्हाला काय फायदा होतो? वाचा सविस्तर

“लीडर होण्यासाठी कर्णधार असणं गरजेचं नाही”, अखेर किंग कोहलीने सोडलं मौन

“शिवसेनेशी आमची युती होण्याचा प्रश्नच नाही, सोनिया गांधी यांना… “

 ऑनलाईन-ऑफलाईनचा गोंधळ वाढला, विद्यार्थ्यांनी केला शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर राडा

“…तर उद्धव ठाकरे आणि अजित पवारांसमोर मी स्वत: दुकानं फोडणार”