महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | पुढील काही तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टीवरील दिल्ह्यांसह मध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

पालघर जिल्ह्यातील काही भाग, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यात पुढील काही तासांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. पुढील काही तासांमध्ये कोकण किनारपट्टीवरील दिल्ह्यांसह मध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे, असं त्यांनी म्हटलंय. आज दुपारी 4 वाजेची हवामानाची स्थिती त्यांनी दिली आहे.

कोकण किरनापट्टीसह उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातही पावसचा अंदाज आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात सातार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अनेक ठिकाणी चांगला पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढच्या पाच दिवसांमध्ये राज्याच्या काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…पण त्यांनी आता शिवसेनेच्या आईवरच हात घातला’, किशोरी पेडणेकरांचा घणाघात 

“कुठलाही गद्दार बाळासाहेबांचं नाव वापरू शकत नाही, मतं मागायचीच असतील तर…”

मोठी बातमी! मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू

उद्धव ठाकरेंना मोठा झटका! शिंदे गटाचं नाव ठरलं?

महाविकास आघाडीची शिवसेना आमदारांवर मोठी कारवाई, एकनाथ शिंदे म्हणतात…