Top news कोरोना देश

काळजी घ्या…, कोरोना रुग्णांमध्ये दिसत आहेत ‘ही’ नवी लक्षणं

corona 2 e1641026902498
Photo Credit-pixabay

नवी दिल्ली | जगभरात सध्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. ओमिक्रॉन (Omicron) या अत्यंत वेगानं संसर्ग पसरवणाऱ्या नव्या प्रकारामुळे ही साथ आली आहे.

सर्दी-पडसे, खोकला, घसा, डोकेदुखी आणि पाठदुखी अशी काही लक्षणं  बाधितांमध्ये दिसत असताना आता नवी लक्षणं दिसून येत आहे.

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये (Bangalore) कोरोनाची लागण झालेल्या आणि विलगीकरणात असलेल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पायांना (बोटांपासून गुडघ्यापर्यंत) तीव्र वेदना आणि घशात खवखव झाल्याच्या तक्रारी आहेत.

मायक्रोबायोलॉजीच्या प्राध्यापक आणि कोरोना नियंत्रणासाठी नियुक्त नोडल अधिकारी डॉ. असिमा बानू सांगतात, वाणी विलास हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले, की गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या तसेच आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांनी पायदुखीच्या तसेच घशात खवखव (etching Throat) होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

घशात फक्त एकच दिवस खवखव होते, तर पाय दुखण्याच्या तक्रारी तीन दिवसांपर्यंत राहतात, नंतर पाय दुखणं थांबते. पी. जी. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना 5 जानेवारीला कोरोनाची लागण झाल्यानंतर 6 जानेवारीला त्यांना पायाचं दुखणं सुरू झाल्याचं कळतंय.

दरम्यान, एकीकडे कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढत आहे. ओमिक्रॉन वेरियंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 4461 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात काल राज्यात 31 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.सर्वाधिक 28 रुग्णांची पुण्यात नोंद झालीय. पुणे ग्रामीण 2 पिंपरी चिंचवडमध्ये 1 रुग्ण सापडलाय. आतापर्यंत राज्यात 1247 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.

467 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे. ओमिक्रॉन संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, केरळ, आणि गुजरातमध्येही ओमिक्रॉनचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण! 

“…म्हणून ओमिक्रॉन व्हेरिएंटला वेगाने पसरू दिलं पाहिजे” 

“संजय राऊत यांनी सांगावं की, शरद पवार पंतप्रधान कधी होतील अन् मुख्यमंत्री…”

भाजपला मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याचा सपत्नीक काँग्रेसमध्ये प्रवेश 

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्क्यावर धक्के; आता ‘इतक्या’ आमदारांनी दिला राजीनामा