…ते महात्मा गांधींना हटवून सावरकरांना राष्ट्रपिताही बनवतील- असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली | भाजपकडून इतिहासाची मोडतोड करून मांडणी केली जात आहे. हे असंच सुरू राहिलं तर ज्यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप आहे आणि जस्टीस जीवनलाल कपूर यांच्या चौकशीत ज्यांच्या नावाचा समावेश होता, त्या सावरकरांना हे लोक राष्ट्रपिता म्हणून जाहीर करतील, अशी टीका एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.

राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात सावरकरांबाबत वक्तव्य केलं होतं. हा एका कैद्याचा अधिकार होता. गांधीजींनी सावरकरांना दयेचा अर्ज करण्यास सूचवलं होतं. ज्या पद्धतीने आपण स्वातंत्र्यासाठी अहिंसेच्या मार्गाने लढा लढत आहोत, त्याच मार्गाने सावरकरही जातील असं गांधीजी म्हणाले होते, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं.

उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या ‘वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेन्टेड पार्टीशन’ या पुस्तकाचं राजनाथ सिंह यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

वीर सावरकर एक महान स्वातंत्र्य सेनानी होते, अशा परिस्थितीत विचारसरणीच्या चष्म्यातून पाहून त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांचा अपमान करणे क्षम्य नाही. वीर सावरकर एक महान नायक होते, आहेत आणि भविष्यातही राहतील, असं राजनाथ सिंह म्हणाले.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्यांची इच्छाशक्ती किती प्रबळ होती, याचा अंदाज अनेक प्रसंगावरुन आला.ब्रिटिशांनी त्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावली, पण ते मागे हटले नाहीत, असंही राजनाथ सिंह म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

केंद्राची ऑफर नाकारण्याइतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत- चंद्रकांत पाटील

सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा काय आहे सोन्याचा दर

गल्लीतील दोन महिलांच्या भांडणामध्ये पडला तरूण अन्…, पाहा मजेशीर व्हिडीओ

“तृप्ती देसाई सुद्धा मला भिडताना विचार करुन भिडायच्या”

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी!