Top news देश

गाडी घ्यायचा विचार करताय?; भारताच्या ‘या’ सर्वात सुरक्षित गाड्या नक्की पाहा!

नवी दिल्ली | महिंद्रा कंपनीच्या अनेक गाड्यांना क्रॅश टेस्ट सेफ्टी रेटिंग्ज खूप उत्तम मिळत आहेत. महिंद्राच्या सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही महिंद्रा एक्सयूव्ही 300 या कारला ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार मिळाले आहेत. तर महिंद्रा थार आणि महिंद्रा मराझो यांना 4-4 सेफ्टी रेटिंग देण्यात आले आहेत.

महिंद्राच्या या गाड्या वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे. अपघातादरम्यान गाडीतील प्रवाशांना किती प्रमाणात धोका आहे, त्याच्यावर क्रॅश टेस्ट सेफ्टी रेटिंग्ज दिले जातात. सुरक्षा वैशिष्ट्यांसह, कारची ताकद तपासण्यासाठी ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्ट वेळोवेळी घेतल्या जातात आणि कारला सेफ्टी रेटिंग्ज दिली जातात.

अलीकडे नव्याने कार घेणारे अनेक ग्राहक सेफ्टी रेटिंगवर जास्त लक्ष देत आहेत. कंपन्या देखील कारच्या सेफ्टीवर जास्त लक्ष देत आहेत. महिंद्रा बरोबरच टाटा मोटर्सच्या देखील अनेक गाड्यांना खूप उत्तम प्रकारचं रेटिंग आहे.

महिंद्राची सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही एक्सयूव्ही 300 ही भारतातील सर्वात सुरक्षित कार आहे. नुकत्याच झालेल्या ग्लोबल एनसीएपी क्रॅश चाचणीमध्ये, एक्सयूव्ही 300 ला प्रौढ ऑक्यूपेंट प्रोटेक्शन कॅटेगिरीमध्ये 5 स्टार मिळाले आहेत. तर चाईल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शन कॅटेगिरीमध्ये या गाडीला 4 स्टार मिळाले आहेत.

महिंद्रा कंपनीच्या नुकत्याच लौंच झालेल्या महिंद्रा थार या कारला देखील ग्लोबल एनकैप क्रैश टेस्टमध्ये 4 स्टार मिळाले आहेत. प्रौढ ऑक्यूपेंट कॅटेगिरीमध्ये या कारला 17 पैकी 12.5 टक्के रेटिंग मिळाले आहे. तर चाईल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शन कॅटेगिरीमध्ये या कारला 49 मधील 44.11 पॉइंट मिळाले आहेत.

तसेच ग्लोबल एनकैप क्रैश टेस्टमध्ये महिंद्राच्या एमपीवी मराजा या कारला देखील 4 स्टार मिळाले आहेत. 7 सीटर असणाऱ्या या कारला प्रौढ ऑक्यूपेंट कॅटेगिरीमध्ये 4 स्टार आणि चाईल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शन कॅटेगिरीमध्ये 2 स्टार मिळाले आहेत.

क्रॅश टेस्ट दरम्यान महिंद्रा मराजा या गाडीत ठेवलेल्या डमीच्या डोक्याला आणि मानेला दुखापत झाली नाही. या कारमध्ये प्रवासी आणि चालकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कंगनाचं ट्वीटर अकाउंट निलंबित होणार? मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

‘या’ दोन रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा सर्वात कमी धोका!

धक्कादायक! एम्सच्या डॉक्टरांना कोरोना रुग्णांमध्ये आढळली ‘ही’ दोन नवी लक्षणं!

एकनाथ खडसेंच्या आरोपानंतर 1100 कोटींच्या ‘त्या’ घोटाळ्यावर गिरीश महाजन म्हणाले…

टाटा, ह्युंदाई आणि महिंद्राला जोरदार टक्कर; अवघ्या 4 लाखात मिळणार ‘ही’ SUV